#Malshiras:राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालय माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी रविवार दि. २७ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा कार्यालयाचे मार्गदर्शक उत्तमराव जानकर साहेब यांनी कार्यालयाबद्दल त्यांना माहिती दिली.
कोणतेही शासकीय काम होणार फक्त एकच कॉलवर तेही घरात बसून व आपले समस्या सोडवणे हेच आमचे काम... फक्त कॉल करा आणि मिळवा शासकीय कागदपत्रे आता आपल्या घरी अशी संकल्पना घेऊन तालुक्यातील गोरगरिबांना हेलपाटे कमी करून लवकरात लवकर कामे करून देणार असल्याचे यावेळी जानकर यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे याचा फायदा नक्कीच तालुक्यातील जनतेला होईल असे मत पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांकाचे अनावरण पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माणिकराव वाघमोडे, तुकाराम देशमुख, डॉक्टर मारुती पाटील, उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, गौतम बाबा माने, पांडुरंग वाघमोडे, विकास धाईंजे, अजय सकट, बाबा माने, दादासो वाघमोडे, के पी काळे, किरण सावंत, मारुती देशमुख, पिन्टू बंडगर, मोहन कचरे, सोमनाथ पिसे, सचिन टेळे, पांडुरंग पिसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
● ७०८३१११०२० हेल्पलाईन क्रमांक !
७०८३१११०२० या हेल्पलाईन क्रमांकाचे अनावरण झाले. तालुक्यातील कानाकोपऱ्यातील अडचणी या हेल्पलाईन वरती कळविल्यावर त्याठिकाणी कार्यकर्ता पाठवून घरूनच लोकांची कामे करण्यात येणार आहेत. शासकीय योजना, दाखले, कागदपत्रे, विकासकामे लवकरात लवकर करण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment