#Pune:पुणे बार असोसिएशन नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे पाटील यांचा ॲड कैलास पठारे पाटील व ॲड पांडुरंग ढोरे पाटील यांनी केला सत्कार
महादरबार न्यूज नेटवर्क -
पुणे बार असोसिएशन २०२२-२३ च्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष व उद्योजक ॲड पांडुरंग ज्योतीभाऊ थोरवे पाटील यांचा शिवाजीनगर कोर्ट येथील त्यांच्या ऑफिसमध्ये दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीचे मा.चेअरमन विद्यमान संचालक व भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र चे कायदेशीर सल्लागार ॲड. पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील व भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲड. कैलास विश्वनाथ पठारे पाटील यांच्याकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ॲड थोरवे पाटील यांच्या ऑफिसमध्ये करण्यात आला.
यावेळी पुणे बार आसोसियशन चे मा.उपाध्यक्ष ॲड श्री रूपेश कलाटे पाटील, उद्योजक ॲड.समीर बेलदरे पाटील, ॲड श्री किर्ती कुमार श्रॉफ,पुणे बार असोसिएशन चे मा.सदस्य ॲड.समीर भुंडे,ॲड.अमोल भुजबळ, ॲड ऋषीकेश गावडे आणि इतर वकील उपस्थित होते. सर्व मान्यवरांकडून नवनिर्वाचित पुणे बार असोसिएशन अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे पाटील यांस पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पुणे बार असोसिएशन ला सर्वात छान संयमी, सुसंस्कृत सुविचारी, विधि अभ्यासपूर्ण,संघटन कौशल्य, वकील संघटनेत अधिक प्रमाणात कसे संघटन मजबूत होईल व अनेक प्रश्नांवर मात करून पुढे जाता येईल असे व्यक्तीमत्व आपले सर्वाचे आवडते नेतृत्व ॲड. पांडुरंग ज्योतीभाऊ थोरवे पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत.
ॲड. कैलास विश्वनाथ पठारे पाटील.
भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ.
Comments
Post a Comment