#Tuljapur:श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या प्रमुख दोन्ही दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमास हटके स्वरूप देण्यासाठी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते ते म्हणजे ज्यांनी एका छोट्याशा गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली ते काक्रंबावाडी गावचे सुपुत्र पत्रकार, लेखक, कवी, दिग्दर्शक, कलाकार, युवा समाजसेवक , भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष, युवारक्षक भारत सामाजिक संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अध्यक्ष, पोलीस जाणीव सेवा संघ तुळजापूर चे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद चे सदस्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महेश बजरंग कोळेकर हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विज्ञानप्रेमी कोरे सर ही उपस्थित होते.
यावेळी महेश बजरंग कोळेकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांवर तसेच कविता कशी असावी, कवी कोण असतो, शब्दांची ताकत काय असते , मराठी भाषेचे महत्व आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे किती गरजेचे आहे ते सांगितले. श्री. कोरे सर यांनी विज्ञान आणि कवितांना उजाळा दिला. विज्ञानातील गमतीजमती ही सांगितल्या. जीवनातील विज्ञानाचे महत्व समजावून सांगितले.
यावेळी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चे प्राचार्य श्री. घोडके सर, तसेच शिक्षक श्री. सुरवसे सर, सूत्रावे सर आणि मराठी, हिंदी, इंग्रजी विभाग तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षक आणि इतर सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment