#Natepute:शालेय व्यवस्थापन समिती सत्कार समारंभ थाटामाटात


महादरबार न्यूज नेटवर्क - चंदू खिलारे
जि.प.प्राथमिक केंद्र शाळा कळंबोली येथे नवीन शैक्षणिक कमिटी यांची सहविचार सभा घेण्यात आली .सर्व सदस्य उपस्थित होते .सर्वाचा सत्कार करण्यात आला. व विद्यार्थी पट वाढवणे याविषयी सर्वांना विभाग देऊन संपर्क करण्यास सांगण्यात आले.शिवाय गुणवत्ता वाढण्यासाठी काय केले पाहिजे यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली .

यावेळी साळवे सर यांनी पट वाढवण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले .प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कलशेट्टी मॅडम यांनी केले.गुणवत्ता वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करतायेतील हे घाडगे मॅडम यांनी सांगितले.  विकास वामन खिलारे हे अध्यक्ष यांनी शालेय सुविधा व गुणवत्ता चांगलीच वाढली पाहिजे यावर विवेचन करून  कमिटीचे सर्व सहकार्य १०० टक्के असणार कोणतीही अडचण येणार नाही असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित मान्यवर विकास वामन खिलारे (अध्यक्ष),सौ.आशा उद्धव नलवडे (उपाध्यक्ष),संजय भानुदास वाघमोडे (सदस्य),रुपाली संतोष चोरमले (सदस्य),विजय भाऊराव शिंदे (सदस्य),रेश्मा सचिन सोरटे (सदस्य),दादा सिताराम कर्चे (सदस्य),किशोर पोपट कांबळे (शिक्षणतज्ञ),सौ.उमा दिनकर खिलारे (प्रतिनिधी),दादा शिवाजी साळवे (शिक्षक प्रतिनिधी),स्वती मोहन धायगुडे (विद्यार्थी प्रतिनिधी),श्रावणी अंकुश जाधव (विद्यार्थी प्रतिनिधी), सुवर्णा सिद्रामप्पा कलशेट्टी (सचिव) अश्या खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपंन झाली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम