Hot Posts

6/recent/ticker-posts

#Tuljapur:कवी महेश बजरंग कोळेकर यांनी मांडली ग्रामसभेची आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यथा....


महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी काक्रंबावाडी येथील युवा कवी महेश बजरंग कोळेकर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडली ग्रामसभेची व्यथा.
           
         ग्रामसभा

अरे काय कामाची ही असली ग्रामसभा,
आपण खायची सालपट आणि ते खाणार गाभा...

अरे कोण कोणाचं नसत जाऊद्या त्यांना उडत,
कोण पाहिलंय का ग्रामपंचायत किती आलीय बुडत...

अरे काय ठेवलंय त्या अध्यक्ष पदात,
खरी ताकद असते थोरामोठ्यांच्या विचारात....

कोण गरीब कोण श्रीमंत मुळात कोणी नसतोच इथे,
माणुसकीचा निर्मळ झरा वाहतो जिथे....

अरे कोणी तरी बनायला शिका शांती दूत,
का पाडताय एकाच गावातल्या माणसां माणसांमध्ये ग्रामसभेच्या नावाखाली फूट....

हात जोडून सांगतो साहेब आतातरी गावच्या विकास कामांवर द्या लक्ष,
मरताना कोण येत नसत ओ सोबत शेवटी येतो तो फक्त माणुसकी नावाचा पक्ष...

शेवटी एकच सांगणं साहेब माझं तुमच्या पवित्र आत्म्याला,
थोरामोठ्यांचे विचार सोबत घेऊन या येताना पुढच्या ग्रामसभेला...
        अशाप्रकारे ग्रामसभेची व्यथा त्यांनी मांडली आहे व सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

Post a Comment

0 Comments