Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune: "राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून एक अनोखा गुलाब दिवस(Rose Day) साजरा"


महादरबार न्यूज नेटवर्क -
येणारा प्रत्येक क्षण हा आनंद देणारा क्षण  प्रेमळ व आनंदी व्यक्तिंसमवेत साजरा करावा याचाच प्रत्यय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कसबा मतदार संघ पुणे उपाध्यक्ष यश सोमनाथ वाघमारे यांच्याकडून आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराकडून आला.

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असे म्हणतात त्याची सुरुवात पहिल्या आठवड्यात ७ तारखेपासून आपल्या valentine ला गुलाब देऊन म्हणजे रोज डे साजरा करून होते.आणि असाच गुलाब डे या युवकांनी काही आगळ्या वेगळ्या पद्धत्तीने साजरा केला.त्यांनी माय माऊली वृध्दआश्रम कात्रज येथे भेट दिली आणि तेथील वृद्धाश्रमात खाऊ आणि धान्य वाटप तर केलेच पण सोबतच तेथील वृध्द आजींना गुलाब देऊन त्यांच्या सोबत गुलाब दिवस साजरा करत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले.आणि या कृतीतून या सर्व युवकांनी समाजापुढे एक समाजसेवेचे नवीन उदाहरण ठेवले.

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा पुणे चे उपाध्यक्ष यश वाघमारे सोबत त्यांचे राकेश लखारा, अनिकेत चिंचवले, कपिल घोरपडे, बाळासाहेबमामा ढमाले, पंकज जैन , इ मित्रपरिवार या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम पार पाडला.

Post a Comment

0 Comments