#Tuljapur:महेश कोळेकर यांची युवारक्षक (भारत) या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील छोटयाशा गावातील तरुण महेश बजरंग कोळेकर यांची युवारक्षक (भारत) या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
युवारक्षक (भारत) या संघटनेचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जगन्नाथ बेंगळे आणि प्रमुख पदाधिकारी राहुल भैय्या मासाळ यांच्या प्रमुख अध्यक्षते खाली महेश बजरंग कोळेकर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महेश बजरंग कोळेकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, देशाबद्दल असणारी त्यांच्या मनातील देशहित भावना ओळखून तसेच त्यांचे असणारे सामाजिक भान लक्षात घेऊन युवारक्षक (भारत) संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे म्हणाले, की युवारक्षक या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवकांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्यांना मदत करणे, आणि उद्याच्या विकसित भारत देशासाठी सेवा बजावणारा नवतरुण घडवणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग व्यवसायासाठी मदत करणे होय. आज महेश बजरंग कोळेकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा भरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment