#Natepute:कारुंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम


महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकावर ,सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलं कारुंडे तालुका माळशिरस हे अतिदुर्गम गाव , सोलापूर पासून दीडशे किलोमीटर अंतरावर पण या गावाची ओळख निर्माण झाली ती जिल्हा परिषदेच्या शाळेने ,सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान संपूर्ण जिल्हाभर मोठ्या उत्साहात राबविण्यात आले यामध्ये अनेक विविध उपक्रम राबवित  इयत्ता पहिली ते आठवीच्या गटांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे या शाळेला मिळाला. 

या स्पर्धेचा निकाल दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभाग्रह सोलापूर याठिकाणी घोषित करण्यात आला. जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिला क्रमांक आलेल्या शाळांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्ता मामा भरणे साहेब यांचे उपस्थितीत विधान भवन मंत्रालय मुंबई या ठिकाणी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सत्कार स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष अमोल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री माऊली मसुगडे ,शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ शिंदे, शरद रुपनवर, संतोष पवार आदी शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी या संपूर्ण अभियानाचे तोंड भरुन कौतुक केले तसेच ही संकल्पना ज्यांच्या संकल्पनेतून राबविली गेली ते सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांचे तोंड भरून कौतुक ही करण्यात आले तसेच विजेत्या शाळांचेही कौतुक अजितदादांनी केले.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा नजिकच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आकार घेतील असा विश्वास अजितदादांनी बोलून दाखवला अशा चांगल्या शाळांना भेटी द्यायला, त्या शाळा पाहायला मला निश्चित आवडते ,अशा शाळांना नजीकच्या दोन महिन्यांमध्ये भेटी देऊ असा विश्वास अजितदादांनी दिला जे कर्मचारी मनापासून काम करतात त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे आम्हा पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे अशा शब्दात केलेल्या कामाची पावती अजित दादांनी दिली.
         
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे यांनी कारुंडे शाळेचे नाव घेऊन कौतुक केले अशी गाव ,असे अधिकारी असे पदाधिकारी एकत्र आल्यास ऐतिहासिक काम झाल्याशिवाय राहत नाही ते कारुंडे येथील लोकसहभागातून लक्षात येते नजिकच्या काळामध्ये कारुंडे शाळेला भेट देण्याचा दिला विश्वास तसेच मा.करे साहेबांचे मानले आभार.

याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांनी हे अभियान राबविण्या पाठीमागचा उद्देश संपूर्ण सभागृहाला याठिकाणी सांगितला, कोरोना काळामध्ये ची परिस्थिती जिल्हा परिषद शाळेची झालेली होती त्यामधून शाळेला नवचैतन्य मिळावं या उद्देशाने हे अभियान राबवण्याचे सांगितले तसेच आतापर्यंत वीस विविध उपक्रम राबविले असल्याचे माननीय दिलीप स्वामी साहेब यांनी सांगितले..... सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री किरण लोहार, 
माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय श्री श्रीकांत खरात, माळशिरस तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री धनंजय देशमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री,,प्रदीप करडे केंद्रप्रमुख श्री दत्तात्रेय झेंडे तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकाचे अभिनंदन केले .
कारुंडे गावातील सरपंच उपसरपंच व गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. ही शाळा म्हणजे आमच्या गावचे वैभव आहे .अशा शब्दात गावचे माजी सरपंच अमर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली. माजी सरपंच  हनुमंत पाटील यांनीही शाळेच्या मुख्याध्यापकांचे शाळेच्या  शिक्षकांचे तोंड भरुन कौतुक केले .

एकंदरीत शाळेच्या या सन्मानामुळे कारुंडे गावातील प्रत्येक ग्रामस्थांची मान उंचावली असल्याचे नूतन सरपंच बायडाबाई ज्ञानदेव पाटील , उपसरपंच बायडाबाई रूपनवर पाटील यांनी सांगितले.

गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी शाळेला सहकार्य केल्याने स्वच्छ शाळा सुंदर शाळा यामध्ये कारुंडे शाळेचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.
अमोल पाटील.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कारुंडे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम