#Pune:भारतीय पत्रकार संघ(AIJ) महाराष्ट्र लीगल विंग च्या चेअरमन पदी ॲड. कैलास पठारे पाटील यांची निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र लीगल विंगच्या चेअरमनपदी पुण्याचे अॅड. कैलास पठारे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशनानुसार तसेच संघटन मंत्री विनोद सोलंकी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम एस शेख , संघटक अनिल सोनवणे तसेच महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पल्लवी नंदुरबार यांच्या सहमतीने राष्ट्रीय मुख्य महासचिव पंडित मनोहर मंडलोई यांच्या हस्ते ॲड.श्री कैलास पठारे पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून कैलास पठारे पाटील यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पत्रकारांच्या हितासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांची महाराष्ट्र प्रदेश लीगल विंगच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. कैलासजी पठारे पाटील यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड पांडुरंग ढोरे पाटील,अँड योगेश तुपे, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष लतीफभाई नदाफ,तसेच माळशिरस तालुक्यातील पत्रकार संघ पदाधिकारी व सदस्य, सांगली जिल्हाध्यक्ष प्रसाद कडव यांसह सातारा,कोल्हापूर, पुरंदर बारामती,दौंड करमाळा,बार्शी नाशिक आदी विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment