#Malshiras:घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे अभिवादन

  
महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अकलुज मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी माजी सरपंच पांडुरंग भाऊ देशमुख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अकलूज शहर अध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव रणजीत देशमुख, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग साजिद सय्यद, अकलूज शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जाकीर शेख, काँग्रेस कमिटीचे अकलुज शहराध्यक्ष नवनाथ साठे तसेच रविराज गायकवाड, मोहसिन बागवान, आदेश गोसावी, शैला गोसावी, नाना गुंड आदी पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम