Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:ज्ञानसेतू मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन

महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय तालुक्यातच होण्यासाठी तालुक्यातील २८८ अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या  ज्ञानसेतू या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  यांच्या हस्ते हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले . 

हे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका आय पी एस  पोलीस उपायुक्त  वाहतूक विभाग ठाणे शहर बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख हेमंत कुमार सानप, अवर सचिव महसूल विभाग विनायक लवटे, उपजिल्हाधिकारी हरेश सुळ, उपसंचालक बॉयलर संदीप कुंभार, प्रांतअधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, अकलूजचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव ,गट विकास अधिकारी संतोष राऊत,गटविकास अधिकारी सचिन खुडे ,सहाय्यक विक्रीकर आयुक्त मनीषा वाघमोडे ,अमोल मस्कर उप अभियंता पाटबंधारे  विभाग,  पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस स्टेशन अरुण सुगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे,API शेळके माळशिरस पोलीस स्टेशन,अमोल मस्कर उप अभियंता पाटबंधारे  विभाग,विजय मारकड उपअभियंता जलसंपदा विभाग तसेच 
 तालुक्यातील सर्व अधिकारी, विद्यार्थी पालक सामाजिक, राजकीय, क्रीडा, शेतकरी अश्या सर्व स्तरातील लोक उपस्थित होते . 

जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पहिला  असा उपक्रम  आहे. हे लावलेले रोपटे लवकरच वटवृक्षात रूपांतर होईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयपीएस शुभम जाधव यांनी त्यांचे  मत व्यक्त करत मार्गदर्शन केले तसेच हरेश सुळ यांनी मत व्यक्त केले व मार्गदर्शन देण्यास सदैव तयार आहे असे सांगितले. 
लवकरच माळशिरस तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला  जाईल असे सर्व अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली आहे. 

सर्व अधिकारी यांनी एकत्र येऊन अश्या अभ्यासिकेचे आयोजन केले आहे, ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. या अभ्यासिकेचा मुलानी जास्तीत जास्तीत फायदा घेतला पाहिजे व विद्यार्ध्यानी आपल्या महाराष्ट्राबरोबर देशाचे नाव मोठे केले पाहिजे.
मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी, सोलापूर


काहीतरी करण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा असली की आपण कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो.दुसऱ्याचा मुलगा करतो माझा का नाही,दुसरा करतो मग  मी का नाही करू शकत नाही अशी भावना प्रत्येकांनी मनात आणली पाहिजे. आपला तालुका अधिकारी यांचा तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे.
बाळासाहेब वाघमोडे पाटील 
आयपीएस वाहतूक पोलीस उपायुक्त ठाणे शहर

Post a Comment

0 Comments