#Chiplun:आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील चिंचघरी येथील विविध विकास कामे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
चिपळूण  संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे  लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून चिंचघरी येथील आग्रेवाडी येथे पाखाडी बांधणे आणि नळपाणी योजना दुरुस्ती,गावमंदिर ते  शंकरमंदिर रस्ता डांबरीकरण,गावमंदिर हनुमानवाडी येथे हायमॅक्स लाईट हनुमान मंदिर स्मशानभूमी रस्ता उदघाटन, कराडरोड ते रघुनाथ खेतले घर रस्ता गटार, भाग्योदय नगर येथे गटार बांधणे, विश्वनाथ कदम घराकडे रस्ता करणे, सती नाका येथे हायमॅक्स लाईट लावणे या कामाचे उदघाटन व भूमिपूजन करण्यात आली. 

गेली १० वर्षांमध्ये जे कोणाला जमलं नाही ते आमदार शेखरजी निकम यांनी करून दाखवलं आहे असे डॉक्टर राकेश चाळके म्हणाले. सरपंच अमित आग्रे यांनी सुद्धा आमदार शेखर निकम यांच्या कामाचे कौतुक केले.
आमदार शेखरजी निकम यांनी राकेश चाळके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच चिंचघरी गाव शहरांलगत असून भविष्यात अजून कामे केली जातील असाही शब्द दिला तसेच वाढदिनी शुभेच्या दिल्या.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, विधानसभा अध्यक्ष दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खातते, माजी सभापती राजाभाऊ चाळके,माजी सभापती पूजा निकम, डॉक्टर राकेश चाळके, जिल्हा युवती अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा बँक संचालक दिशा दाभोलकर, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, महिला अध्यक्ष जागृती शिंदे, विनोद खताते, जयंत शिंदे, सरपंच अमित आग्रे, शिरीष काटकर, अवि हरदरे, मिलिंद कापडी, अविनाश केळस्कर, सरपंच अमित आग्रे, राजेश चाळके, स्मिता चाळके, कांचन चाळके, नाजिया बेबल, दीक्षिता चाळके, अनिता गुरव, गंगाराम चाळके, डॉक्टर पोतदार, रमेश चाळके, रवींद्र आग्रे, पंढरी आग्रे, मधुकर चाळके, भगवान कांबळे, सुरेश गुरव, दिलीप चाळके, दिनेश चाळके, रुपेश कांबळे, अनंत माने, अंकुश माने, प्रदीप चाळके, मनीष चाळके, कादिर इनामदार, अश्फाक बेबल, निसार खान, सीताराम चाळके, एल. के. शिंदे, कुंभार सर, मोरे सर, अजय चव्हाण, दीपक कदम, दत्ताराम चाळके, अशोक मूकनाक, मयूर चाळके, किशोर चाळके, राकेश चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम