Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:धर्मपुरी विकास सेवा सोसायटीच्या सर्व जागा मिळवत शेतकरी विकास पॅनल ने मिळवला ऐतिहासिक विजय


महादरबार न्यूज नेटवर्क - 
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे धर्मपुरी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२१-२२ ते २०२६-२७ या निवडणुकीत 
सत्ताधारी शेतकरी विकास गटाने, परिवर्तन विकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला विजय होऊ दिले नाही सर्वच्या सर्व तेरा जागेवरती सत्ताधारी गटाने विजय मिळवला आहे.

या विकास सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये  परिवर्तन विकास आघाडी ला खातेही खोलता आले नाही.
शेतकरी विकास पॅनल ने विजयकुमार तानाजीराव पाटोळे, दादा काटकर, उत्तम निगडे, संभाजी पाटील, बाजीराव सुदाम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर परिवर्तन विकास आघाडी नितीन निगडे, नामदेव निटवे, संजय झेंडे, प्रदीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविली.

विकास सोसायटी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात-  संतोष धनपाल जैन , हरिश्‍चंद्र गणपत  काटकर, विष्णू प्रभू केंजळे ,  चंद्रकांत धोंडीबा मसुगडे , मोहन भानुदास  मोरे ,  महावीर रामचंद्र निगडे, नानासो बाळासो पाटील, संभाजी भिमराव पाटील.
तर महिला राखीव गटात - शशिकला अरुण पाटील , सारिका लालासो पाटोळे.
इतर मागास प्रवर्ग गटात -  भारत पांडुरंग  राऊत .  भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात -  मंगल सोपान माने . अनुसूचित जाती जमाती गटात-  महादेव नाथा झेंडे हे आहेत.

निवडीनंतर विजयी उमेदवारांनी सोसायटीचे माजी चेअरमन स्वर्गीय तानाजीराव पाटोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला करून जल्लोष करत गावातून भव्य मिरवणूक काढली.

सोसायटी सभासदांनी आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पोच पावती दिली आहे . आमचे काम चांगले असल्याने सभासदांनी आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे. सभासदांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू.
बापूराव पाटोळे.

Post a Comment

0 Comments