#Chiplun:गोवंश वाहतूक तात्काळ थांबवा
माखजन परिसरातील ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक तात्काळ रोखा, यासाठी माखजन पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी,ग्रामस्थांनी संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक उदय झावरे याना निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात शासनाने सण २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला आहे.परंतु या कायद्यायची अंमलबजावणी संगमेश्वर तालुक्यात कोठेही केलेली दिसून येत नाही.असे स्पष्ट उल्लेख करत पोलीस खात्याकडून याबाबत दिरंगाई केली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
रात्री,अपरात्री ,पहाटे शेकडो गोवंश अवैधरित्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेले जातात,गोवंशाला कसाई लोक डांबून,दाटीवाटीने गाडीत भरून अमानुषपणे कत्तलीसाठी नेण्यासाठी वाहतूक करतात.हे सर्रास स्थानिकांच्या निदर्शनास येत आहेत,संबंधित गाड्या स्थानिक तर काही परजिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास येतअसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याआधी संगमेश्वर तालुक्यातून अशा प्रकारे होणारी गोवंशाची अवैध वाहतूक अनेक ठिकाणी अडवण्यात आली आहे.परंतु याकडे आजवर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.चेक नाके,पोलिसांची गस्त असून देखील हे कारभार राजरोस कसे चालतात हे कळून येत नसल्याचे म्हटले आहे.
यापुढे अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या गाड्या अडकवून त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान निवेदन देताना संदीप उर्फ बबू कवळकर , स्वप्निल बापट,उदय सहसरबुद्धे, राजा सावंत,अक्षय चव्हाण कळबूशी , बाबू मोरे,वरद खांडेकर,गणेश देवरूकर, संतोष कनिम,राजू केसरकर,अरविंद लिंगायत,मारुती कवळकर,रवी रजपूत आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment