#Natepute:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नातेपुते येथे गरजू व पात्र कुटुंबांना तहसिल कार्यालय माळशिरस यांच्यामार्फत मोफत शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न



महादरबार न्यूज नेटवर्क-
नातेपुते शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गरजू व पात्र कुटुंबांना मोफत रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम जिल्हा पुरवठा कार्यालय सोलापूर व तहसिल कार्यालय माळशिरस यांच्यामार्फत नातेपुते येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नियोजन मंडल अधिकारी कार्यालय नातेपुते, तलाठी कार्यालय नातेपुते व सर्व रेशन दुकानदार नातेपुते यांच्याकडून करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन गेले एक महिन्यापासून कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत (सर) यांच्याकडून करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये २०१ रेशन कार्ड वाटप करण्यात आले असून काही कुटुंबाच्या     कागदपत्रातील त्रुटी दूर करून पुढील दहा दिवसात रेशन वाटप केले जाणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पुरवठा विभाग व कार्यक्रमाचे आयोजक यांचे सामाजिक कार्यक्रमाबद्दल कौतुक केले व पुढे बोलताना सांगितले की,ज्या कुटुंबांची उत्पन्न जास्त झाले अशा लाभ धारकांसाठी एक शिबीर घेण्यात यावे आणि त्यांचे धान्य कमी करून योग्य व गरजू लाभार्थी कुटुंबांना योजनेत समाविष्ट करण्यावर भर देण्यात यावा तरच या स्वस्त धान्याचा लाभ योग्य गरजू पर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

 माळशिरस तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाचे अधिकारी लोखंडे यांनी उपस्थित नागरिकांना रेशनकार्ड संदर्भात विभक्त व नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी शासकीय नियम व त्याची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे आयोजक विनायक सावंत (सर) यांनी याप्रमाणे इतरही शहरांमध्ये असेच उपक्रम राबवावे अशा सूचना केल्या पुरवठा विभाग पूर्णपणे आपणास सहकार्य करेल असेही यावेळी सांगितले.

                    Advertising



 कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर,माळशिरस तहसिल पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर,पुरवठा अधिकारी चंद्रकांत लोखंडे,रमेश वाघमारे ,सलीम शेख ,शरद बनसोडे, नातेपुते मंडळ अधिकारी संदीप चव्हाण , तलाठी प्रभाकर उन्हाळे तसेच रेशन दुकानदार अण्णा पांढरे, किरण टकले ,बाळू आवटे ,समीर सोरटे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ढोबळे, गोरख ढोबळे, सुनील ढोबळे ,साप्ताहिक सोलापूर लाईफलाईन संपादक अमित सोरटे तसेच कार्यक्रमाचे आयोजक विनायक सावंत (सर) शिधापत्रिका लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित नागरिकांमधून मोफत रेशन कार्ड विशेष मोहीम राबविल्यामुळे व रेशन कार्ड मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सोरटे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आयोजक विनायक सावंत यांनी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम