#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिरात मनोरंजनासोबत भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

   

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे,या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस"अत्यंत उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे शाळा  बंद होत्या.विद्यार्थी शाळेत  येऊ शकत नव्हते.यावर्षी पूर्णपणे कोरोना चे नियम पाळून शाळा उत्साहात सुरू होत आहे.विद्यार्थ्यांची पावले शाळेकडे वळू लागली आहे.आमचा शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी औक्षण करून उत्साहाने स्वागत करण्यात आले.व नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना आकर्षक  भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेचा पहिला दिवस मनोरंजक व्हावा. यासाठी विद्यार्थ्यांसोबत गप्पा गाणी गोष्टी घेण्यात आले.
शाळा व शिक्षक तसेच नवीन पुस्तके पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.


                         Advertise

तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकर्षण म्हणून मिकीमाऊस ने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळा बघून आनंद व्हावा. म्हणून शाळेमध्ये कार्टून,फुगे, वेगवेगळी चित्रे लावून सजावट करण्यात आली.तसेच बालगीतांचा स्वरांनी शाळेचा परिसर आनंदमय झाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मा.मुख्याध्यापिका सौ.अनिताताई दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत