Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिरचे १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश


महादरबार न्यूज नेटवर्क  -  विलास गुरव
२०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १०  वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. सलग सहाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने व विद्यार्थ्यांनी अबाधित ठेवली आहे. 

यंदा शाळेचे ६० विद्यार्थी १०वीच्या परीक्षेला बसले होते. यावर्षीही शाळेचा गुणात्मक निकाल लागला आहे. यात श्रावणी आनंद कळंगुटकर हिने ९६.२०%  गुण मिळवून प्रथम क्रमांक, ईश्वरी विकास कोलपेकवार हिने  ९१.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर वैष्णवी रविंद्र काजवे हिने ९०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.


                     Advertisement
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली वाशिमकर, सौ.वंदना प्रक्षाळे,सौ.सुलोचना धनवे, सौ.कावेरी गाडेकर, सौ.प्रांजली सातपुते, वृंदा घन, सौ.क्षमा प्रभूदेसाई या सर्वांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले आहे. सर्व विभागाच्या शिक्षकांचे  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पालकांचे शाळेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments