#Solapur:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित

महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील शाळांना विविध पुरस्कार प्रदान केले जातात. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेतील स्वच्छता, विद्यालय परिसरातील स्वच्छता, व विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या स्वच्छतेच्या  सर्व सोई-सुविधा शाळेत वापरल्या जात असल्यामुळे सन २०२१-२०२२ सालचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार शाळेला मिळाला.

जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. निटवेज. दर्या प्रतिष्ठान संचलित “ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची ” या शाळेचे प्राचार्य मा. ताहेर शेख सर यांनी पुरस्कार स्वीकारला.

शाळेला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम, संचालक आप्पासाहेब शेंडगे , संजय कोडलकर , हनुमंत माने यांनी शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर विशेषकरून स्वच्छता कर्मचारी यांचे अभिनंदन केले. स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची विद्यालयावर पालक व नातेपुते परिसरातील नागरीकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम