#Indapur:शाळेच्या व गावाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणार - तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर
काठी भरतवाडी येथील शाळेसमोर ध्वजारोहण करीत असताना तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
काटी भरतवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी भारतीय 75 वा स्वतंत्र अमृत्व महोत्सवा निमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका आध्यक्षा छायाताई पडसळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा हा उपक्रमही ग्रामस्थांच्या हस्ते राबविण्यात आला.
तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर ध्वजारोहणा नंतर बोलत आसताना म्हणाल्या की माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शाळेच्या व गावच्या विकासासाठी जेवढा विकासासाठी निधी आणता येईल तेवढा जास्त आणण्याचा प्रयत्न करणार व शिक्षकांनी शाळेमधील विद्यार्थी चांगले घडवीले, परंतु इथून पुढेही असेच संस्कार घडवावेत तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर यांचे ध्वजारोहण प्रसंगी उदगार.
इंदापूर तालुका काटी भरतवाडी शाळा या ठिकाणी 75 वा आमृत मोहत्सव साजरा करण्यात आला. गोर गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, वही, पेन, दप्तर, खाण्यासाठी मिठाई व खाऊ याचे देखील या निमित्त छायाताई पडळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 13 ते 15 या दरम्यान सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका राष्टृवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, काटी गावचे माजी उपसरपंच ताटे ,ग्रामपंचायत सदस्य अमित मोहिते , पांडुरंग माहिते, भरतवाडी महिला फाऊंडेशन तसेच शिक्षकवृंद अंगणवाडी सेवीका यांनी उपस्थित राहून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment