#Baramati:बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील पहिली मिरवणूक धनगर समाज सुधारक हरी पिराची धायगुडे यांनी काढली - माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर
हरी पिराजी धायगुडे यांनी १९२० साली पहिली धनगर शिक्षण परिषदेची स्थापना बारामतीत करून धनगर समाजाला दिली दिशा..
महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर
बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील पहिली भव्य मिरवणूक धनगर समाजातील हरी पिराजी धायगुडे या व्यक्तीने काढली. या मिरवणुकीला बारामतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता हा विरोध केवळ अस्पृश्यतेच्या कारणामुळे झाला होता मात्र बारामतीकरांच्या विरोधाला झुगारून धनगर समाजाच्या समाज सुधारक हरी पिराजी धायगुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रेल्वे स्टेशन पासुन ते कचेरी पर्यंत बाजारपेठेतून सन्मानाने मिरवणूक काढली होती.
त्यावेळी हरी धायगुडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बारामतीकरांचा रोष पत्करावा लागला होता, त्यांना काही दिवस वाळीत देखील टाकण्यात आले होते १९२० साली हरी पिराजी धायगुडे यांनी पहिली धनगर शिक्षण परिषदेची स्थापना बारामतीत करून धनगर समाजाला दिशा देण्याचा त्याकाळी प्रयत्न केला होता यातून हरी पिराजी यांची दूरदृष्टी लक्षात येते हा इतिहास आहे. मात्र हा इतिहास कुठेही पुढे आला नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले ते बारामतीत अमृत महोत्सवा निमित्त मल्हार क्लब आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीस वर्षाचे असताना आणि त्यांनी बॅलेस्टर पदवी प्रदान केल्यानंतर त्यांच्या बाबत एक वक्तव्य केले होते की हा माणूस एक दिवस जगात "महामानव" म्हणून उदयास येईल असे भाकीत धायगुडे यांनी त्यावेळी केले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाज कसा वागतो त्याचा व्यवसाय काय आहे कुठे राहतो याची संपूर्ण माहिती स्वतः त्यांच्या वाडग्यात जाऊन जाणून घेतली आणि आरक्षण समिती पुढे परखड भूमिका मांडून डॉ. आंबेडकर यांनी देशातल्या धनगर समाजाला शेड्युल कास्ट (एसटी) ३६ नंबरला धनगर म्हणून समावेश देखील केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू झाले आहेत परंतु महाराष्ट्रातल्या राजकीय स्वार्थी लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये एसटीचे आरक्षण अद्याप मिळालेले नाही. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वेदना होत असतील. त्यावेळी देशांमध्ये ४९ लोकांची आरक्षण समिती असताना ४८ लोकांनी धनगराच्या एसटी आरक्षणाला विरोध केला होता मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी योग्य भूमिका मांडत समितीच्या समोर मांडून हा समाज मेंढपाळ आहे हा समाज दऱ्याखोऱ्या मध्ये भटकंती करीत आहे. जसा आदिवासी समाज राहतो तसाच हा समाज देखील वावरत आहे अशी परखड भूमिका समितीच्या समोर मांडून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याचा ठराव केला आणि त्या समितीने ते मान्य करत धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू केले आहे हा इतिहास आहे हा इतिहास समोर यावा म्हणून लवकरच विधानपरिषदेचे माजी आमदार अड्. रामहरी रुपनवर यांनी लेखन केलेले पुस्तक प्रसिद्ध होणार आहे.
अमृतमहोत्सव निमित्त मल्हार क्लब आयोजित कार्यक्रमावेळी विधानपरिषदेचे माजी आमदार विजयराव मोरे, पीडिसी बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर, बा. खरेदी विक्री संघाचे संचालक नितीन देवकाते, अॅड. रमेश कोकरे, अॅड.अजित कोकरे, वसंत देवकाते, वसंत घुले, अॅड. दिलीप धायगुडे, देवेंद्र बनकर, प्रकाश देवकाते, आनंद देवकाते, ज्ञानदेव खामगळ, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद देवकाते तर आभार बापूराव सोलणकर यांनी मानले.
Comments
Post a Comment