#Natepute:कारूंडे येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबीर

महादरबार न्यूज नेटवर्क -
चैतन्य जप प्रकल्पाचे राज्यस्तरीय शिबीर दि. १२ व १३ नोंव्हेंबरला कारूंडे  ( लोंढे वस्ती ) ता. माळशिरस,जि,सोलापुर या ठिकाणी होणार  चैतन्य जप प्रकल्पाचै  कार्याध्यक्ष शिबीर प्रमूख धैर्यशील देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची अंतिम टप्प्यात तयारी झाली असून या शिबीरामध्ये काकड आरती, अंखड सामूदायिक जप नामस्मरण, शोभायाञा, मिरवणूक, प्रसाद,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
तसेच या शिबिरात राजेंद्र महाराज मोरे, संदिपबूवा मांडके,रांजेंद्र आगवणे, गणपतराव जगताप यांचे प्रवचण किर्तन होणार आहे.

शिबीराचे उद्घाटन सूशिला महादेव पवार यांच्या शुभहस्ते व भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहीते पाटील, माळशिरसचे विधानसभा आमदार राम सातपुते, सातारा  जि. प.माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळक, फलटण विधानसभा आमदार दिपक चव्हाण,धैर्यशिल देशमूख,धनजय पवार,अमर जगताप, अमोल पाटील,लक्ष्मण आसबे, नंदकूमार जोशी, गणपतराव जगताप,साहेबराव देशमूख,विजय लोंढे,  अर्जून जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे  धैर्यशील देशमूख यांनी सांगितले तसेच या शिबिरासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धैर्यशील देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम