#Malshiras:आ.राम सातपुते यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी नियुक्ती
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरसचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आ. राम सातपुते यांची नुकतीच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
आमदार सातपुते यांनी पुणे येथे शिक्षण चालू असताना अ. भा. वि. प च्या माध्यमातून आंदोलन करून प्रसंगी चळवळ उभी करून रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते. त्यावेळी ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.त्यानंतर देखील त्यांनी आपले समाजकार्य असेच चालू ठेवले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू म्हणून ओळखले जातात.त्यांनी केलेल्या कामाची पोहोचपावती म्हणून त्यांना तीन वर्षांपूर्वी माळशिरस विधानसभे ची उमेदवारी देण्यात आली. आणि ते मोहिते पाटील परिवार यांच्या मदतीमुळे निवडून देखील आले.
गेल्या तीन वर्षापासून त्यांनी माळशिरस मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. मोठया प्रमाणावर विकासनिधी आणून अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. तसेच प्रत्येक आठवड्याला जनता दरबार च्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. परिसरातील असंख्य रुग्णांवर मोफत उपचार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.मतदार संघात अनेक विकासकामे केली. गरजूना मदत देखील केली आहे.
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यांच्या निवडीचे माळशिरस तालुक्यातील विद्यार्थी यांनी स्वागत केले आहे.
Comments
Post a Comment