#Natepute:नातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व भव्य दिव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन

नातेपुते येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्यक्रमांची तयारी जोरदार सुरु
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व भव्य किर्तन महोत्सव निमित्ताने गुरूवार दि २४ नोव्हेंबर ते बुधवार ३० नोव्हेंबर पर्यंत या हरिनाम सोहळ्याचे ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजन करण्यात आलेले आहे. शंभू महादेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नातेपुते येथे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती अशा पवित्र भूमी मध्ये चला जाऊ स्वल्प वाटे वाचे गाऊ विठ्ठल या न्यायाने सप्ताहची प्रेरणा ह भ प मनोहर महाराज भगत जेष्ठ किर्तनकार नातेपुते सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सायं ६ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० कीर्तन,             

या सप्ताहातील किर्तनसेवा.
दि,२४ नोव्हेंबर रोजी,ह भ प, गुरुवर्य युवकमित्र बंडातात्या कराडकर.संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र दि २५ नोव्हेंबर रोजी, ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर, दि २६ नोव्हेंबर रोजी, ह भ प देवेंद्र महाराज निढळकर सिंहगड पुणे,दि २७ नोव्हेंबर रोजी ह भ प गुरुवर्य अर्जुन महाराज लाड गुरूजी बीड,दि २८ नोव्हेंबर रोजी, ह भ प कबीर महाराज आतार खेड शिवापुर,दि २९ नोव्हेंबर रोजी,ह भ प पद्माकर महाराज देशमुख,रामायणाचार्य अमरावती, दि ३० नोव्हेंबर रोजी,सकाळी १० ते १२ यावेळेत काल्याचे किर्तन ह भ प, पद्माकर महाराज देशमुख, रामायणाचार्य अमरावती यांचे होईल व कीर्तनानंतर महाप्रसाद होईल.

तरी या सर्व कार्यक्रमांस परिसरातील भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या श्रवण सुखाचा धार्मिक आनंद लुटावा असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह समिती व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्यावतीने करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम