Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर येथील पुलाचे उद्‍घाटन आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न

 महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर निवे मारळ कळकदरा मार्लेश्वर शाखा रस्त्यावरील पुल हा जीर्ण होत चालला होता तो होणे आवश्यक होता. या मार्ग मार्लेश्वर मंदिराकडे जातो आणि येथून हजारो भाविक व पर्यटक मार्लेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात येथील ग्रामस्थांच्या दळणवणासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्या पुलाची पुर्नबाधणी होणे महत्वाची होती. 

दशक्रोशीतील ग्रामस्थ व मार्लेश्वर येथे येणारे भाविक यांची या पुलाची पुर्नबांधणे होणेबाबत सततची मागणी होत होती. आमदार शेखर निकम यांनी या मागणीचा विचार करुन तसेच या पुलाचे महत्त्व लक्षात घेऊन आसपासच्या गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या या जीर्ण होत चाललेल्या पुलापासुन होणा-या अडचणी जाणून घेऊन त्याचा तात्काळीन मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडे पाठपुरावा करुन, हिवाळी अधिवेशन २०२०-२१ बजेट अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील रा.म.मा. ६६  ते तळेकांटे देवरुख मुरादपूर निवे कळकदरा मार्लेश्वर शाखेसह रस्ता रा.मा. १७४ कि. मी. २/५०० मार्लेश्वर शाखेमध्ये लहान पूलाची पुर्नबांधणी करणे या कामासाठी रु. ५० लाखाचा निधी आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजुर करुन आणला.

या मार्लेश्वर पुलाची पुर्नबाधणी चे उद्‍घाटन आज करणेत आले. पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे येथील दशक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी आमदार शेखर निकम व आघाडीचे आभार मानले आहेत

यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी काँग्रेस सर चिटणीस सुरेश बने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विवेक शेरे, आरडीसीसी बँक संचालक नेहा माने, राजेंद्र सुर्वे, बंड्या बोरुकर, छोट्या गवाणकर, वेदा फडके, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसळे, हुसेन बोबडे, निलेश भुवड, शामराव सावंत, जनक जागुष्टे, सचिन मांगले, राजू वनकुंद्रे, प्रफुल्ल बाईत, मंगेश बांडागळे (सरपंच, मुरादपूर), बापू शेट्ये (सरपंच, कोंडगाव), वैष्णवी शिंदे (सरपंच, बामणोली), बंटी गोताड (सरपंच, कनकाडी), सोनाली गुरव (सरपंच, निवे), सोनल चव्हाण (सरपंच, बोंडे), मानसी करंबेळे (सरपंच, कासारकोळवण), मंगला गुरव (सरपंच, मारळ), अरुणा अणेराव (सरपंच, आंगवली), निधी पंदेरे (सरपंच, वांझोळे), नंदू सावंत, आण्णा परब, प्रकाश सावंत, राजू अणेराव, रामू पंदेरे, प्रविण बोंद्रे, किसन राणे, जितेंद्र शेट्ये, अनंत जाधव, ठेकदार संदिप रहाटे, सा,बा विभाग देवरुख पुजा इंगावले, शाखा अभियंता विकास देसाई, व सर्व दशक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments