#Natepute:ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत अनंतात विलीन
महादरबार न्युज नेटवर्क -
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे नातेपुते येथील जेष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले २७ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली नातेपुते येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीराम, श्रीकृष्ण, गणेश अशी तीन कीर्तनकार मुले सून नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने किर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मनोहर भगत महाराज यांना आदरांजली अर्पण केली भजन करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प. मनोहर भगत महाराजांचा अविरत अगदी लहानपणापासून ते आजतागायत प्रसिद्धीपासून दूर राहून प्रामाणिकपणे वारकरी सांप्रदायाचा प्रचार प्रसाराच कार्य करीत राहिले संत परंपरेचा वारसा ते आपल्या किर्तन सेवेच्या व हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पुढे घेऊन जात होते शास्त्र, पुराणे, संतसाहित्य, सामाजिक, राजकीय विषयांची सरमिसळ करत ते श्रोत्यांना त्यांच्या रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करत होते.
समाजातील अंधश्रद्धा दूर करुन शिक्षणाचं प्रमाण वाढावं आणि समाजात प्रेम,आपुलकी, एकोपा व्यसनमुक्ती, धार्मिकता, निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनातील द्वेषाची जळमटं दूर करण्याचं काम आपल्या स्वतंत्र शैलीने ते करत राहिले. केवळ उपदेशाचे डोस न पाजता महाराष्ट्रातील अनेक तरुण त्यांच्या प्रेरणेने माळकरी झाले तसेच किर्तनसेवा करू लागले तसेच स्वतःची मुले व नातूंही आदर्श किर्तनकार म्हणून तयार करून वारकरी परंपरा त्यांनी आजच्या काळात जपली त्यांच्या नेतृत्वाने आजही अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह अविरत सुरू आहेत. आपली सेवा प्रामाणिकपणे करीत होते. महाराजंच कार्य संप्रदायाविषयी अखंड चालू राहिले त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे ब्रीद आणि त्याला जोडून आलेली पथ्ये पाळली. व शेवटी अखंड हरिनाम सप्ताह नातेपुते यांच्या प्रेरणेचा शेवटचा ठरला.
Comments
Post a Comment