#Pune:पत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न’ पुरस्कार प्रदान

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
पुणे येथील पत्रकार प्रतिक गंगणे यांना पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल मणिभाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे हा सन्मान प्रदान करण्यात आला असून संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रतिक गंगणे यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. अशोक पाटील, डॉ. रवींद्र चौधरी, संजय देशमुख, डॉ.सलील पाटील, सुभाष कट्यारमल, गंगाधर पाटील, सीताराम राणे, रवींद्र बराटे, एल.दि.साळवे सर व जिल्ह्यातील अधिकारी, पोलीस, पत्रकार, समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून एकूण 40 लोकांना पुरस्कार देण्यात आला. 

प्रतिक गंगणे यांना या अगोदर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्काराचाही समावेश आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात तसेच राज्याबाहेर अनेक सामाजिक कार्यात सहभागी आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध संस्थेकडून, पत्रकारांकडून व जनमानसात त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत