#Natepute:साखर कारखाने बंद होईपर्यंत पालखी महामार्गावरील म्हात्रे कंपनीचे काम थांबवण्याची हिवरकर पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

महादरबार न्यूज नेटवर्क -
पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील रोडचे जे एम म्हात्रे कंपनी कडून संत गतीने काम चालल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकास तसेच तालुक्याला जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास साखर कारखाने चालू असल्याने व अवजड वाहनाची रहदारी वाढले असल्याने सोलापूर जिल्हा सरहद ते खूडूस पर्यंत चे काम कारखाने बंद होईपर्यंत जे एम म्हात्रे कंपनीचे काम बंद ठेवण्याची मागणी राजकुमार हिवरकर पाटील यांनी मुख्यमंत्री कडे निवेदनाद्वारे केले असून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे ही निवेदन दिले आहे.

राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिलेल्या  निवेदनामध्ये म्हटले आहे की माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या पालखी महामार्गाचे  सोलापूर जिल्हा सरहद  ते खुडूस दरम्यानचे काम म्हात्रे कंपनीकडून अतिशय कासव गतीने काम चालू आहे त्यामुळे वाहतुकीचे कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे माळशिरस तालुक्यात पाच व आजूबाजूच्या तालुक्यामध्ये दहा साखर कारखाने आहेत ऊस कारखान्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे  तसेच सदाशिवनगर साखर कारखाना चालू झाला आहे आणि त्या ठिकाणी म्हात्रे कंपनीने काम जोराने चालू केले आहे त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाले आहे त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचा सापळा झाला आहे.

 मुंबई पुणे या ठिकाणावरून पंढरपूर कडे येणाऱ्या भाविक तसेच माळशिरस कोर्ट तसेच तहसील ऑफिस, पंचायत समिती, अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी जाणे येण्यासाठी नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून जावे लागते तसेच म्हात्रे कंपनीचे अवजड वाहन वाहतूक  त्यामुळे आणखीन वाहतूक कोंडीत वाढ होत आहे तालुक्याच्या कामासाठी अथवा इतर कामासाठी घरून  गेलेला करता माणूस रात्री घरी परत येईल का नाही खात्री देता येत नाही बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर व रेडियम दिसत नाही याकडे पोलीस व आरटीओ यांचेही लक्ष नाही एवढे प्रश्न निर्माण होऊन सुद्धा जे एम म्हात्रे आणि कंपनीचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे त्यामुळे साखर कारखाने बंद होईपर्यंत जे एम म्हात्रे कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनाची प्रत  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत