#Natepute:महा किड्स मध्ये महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव


महादरबार न्यूज नेटवर्क -
12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन, आणि सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख  पाहुणे म्हणून ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.श्रीकांतजी बाविस्कर होते. तसेच  अभिमन्यू आठवले, विलास भोसले, राजुभाई नदाफ उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर पांढरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण केले. यावेळी महा  किड्स  मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची सुमारे 50 पुस्तकांचे प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांच्यासाठी प्रदर्शन मांडण्यात आले होते! प्रमुख पाहुण्यांनी संघर्ष हा समृध्दीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असा संदेश दिला. पूर्व प्राथमिक गटातून स्वामी विवेकानंद वेशभूष प्रथम क्रमांक असद फय्याज मुलांनी, द्वितीय  अर्जुन पवार,  सावित्रीबाई फुले वेशभूषा प्रथम क्रमांक नम्रता गणेश पवार प राजमाता जिजाऊ वेशभूषा प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आर्या राजेंद्र मुंजी, पत्रकार वेशभूषा द्वितीय वेदांत राजेंद्र वाघमोडे, तृतीय आरोही सतिश झंजे यांना देण्यात आला!  पूर्व प्राथमिक भाषण प्रथम विकास नामदेव पवार, द्वितीय असद फय्याज मुलानी, तृतीय संस्कार अजिनात कदम, प्राथमिक गट प्रथम आरुष सुशील गांधी द्वितीय आर्या राजेंद्र मुंजी, तृतीय कार्तिक सुरेश राऊत यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काळे सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  कोमल मिस, पुनम मिस, साधना मिस यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत