#Malshiras:संजय हुलगे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांच्या हस्ते सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क  - 
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतीच 2023 ची नूतन कार्यकारणी घोषित केली.महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. तसेच दुसरी यादी 1 फेब्रुवारी   रात्री ८ वाजता जाहीर करण्यात आली .
यामध्ये माळशिरस तालुक्यातुन पत्रकार क्षेत्रात चांगले काम असलेले संजय दत्तू हुलगे यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद देवुन घोषीत करण्यात आले.

माळशिरस मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तसेच संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर आले असता त्यांनी पत्रकार संजय हुलगे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यने त्यांचा सन्मान करण्यात आला .

महाराष्ट्र पत्रकार संघाने गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. पत्रकारांसाठी कार्यशाळा, रक्तदान शिबिर कोरोना काळात मदत, व्यक्तिमत्व विकास शिबिर राज्यातील पत्रकारासाठी विविध व्याख्यानमाला, पत्रकारावर होणारे अन्यायाबाबत निवेदन व पत्रकारांच्या परिवाराच्या मागे खंबीरपणे महाराष्ट्र पत्रकार संघ उभा राहिला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक गुणवंत पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम