#Malshiras:माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक पार पडली

माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर माळशिरस येथे बोलताना म्हणाले सर्व निवडणूका स्वबळावर लढणार


महादरबार न्यूज नेटवर्क  - 
ता . माळशिरस मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तसेच संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थीतीत बैठक पार पडली .


बोलताना आमदार मा. महादेव जानकर साहेब यांनी यापुढील सर्व निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती ,लोकसभा नगरपालिका रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जानकर साहेबांनी  पदाधिकार्यांना संबोधित केले. तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जावुन कार्यकता जोडला पाहीजे . जिल्हा परिषद पंचायत समिती गण गट वाहीज भेटीदेवुन सभासद वाढवले पाहीजे राष्ट्रीय समाज पक्षाकडे बगण्याचा दुष्टीकोन चांगला आहे . आपण तिथ पर्यंत पोचले पाहिजे . गाव तिथ शाखा तसेच विविध प्रकारच्या आघाड्या स्थापन करा असे आवाहन करण्यात आले .

यावेळी प्रदेशाध्यक्ष  काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव  ज्ञानेश्वर सलगर, जिल्हाध्यक्ष  रणजित सुळ, बाळासाहेब शिंदे , महिला नेत्या कविता माने, जयश्री गावडे ,तालुका अध्यक्ष  वैजनाथ पालवे, जयवंत सरक, संजय रूपनवर, संजय वलेकर सर ,युवा नेते नारायण देवकाते, रणजित झंजे, आबा मेटकरी, नामदेव टकले , संतोष बंडगर साहेब  उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल  संजय हुलगे, उपाध्यक्षपदी  स्वप्नीलकुमार राऊत यांचा सन्मान करण्यात आला . तसेच नूतन सरपंच  राहुल मारकड, दत्तात्रय दडस,  भीमराव खिलारे यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष रणजित सुळ यानी केले तर  सूत्रसंचालन संजय वलेकर सर यांनी केले तर आभार संजय वलेकर सर यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम