Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:गणेश घुले यांचे आयडीबीआय बँकेचे विरोधात अमरण उपोषण


महादरबार न्यूज नेटवर्क  - 
नातेपुते येथील गणेश मल्हारी घुले यांचे खादी ग्राम उद्योग महामंडळाकडून व्यवसायसाठी मंजूर होऊन आलेले कर्ज प्रकरण आयडीबीआय बँक देत नसल्याने आयडीबीआय बँकेचे शाखा मॕनेजर यांच्या विरोधात दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पासून नातेपुते येथील आयडीबीआय बँकेच्या समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.


गणेश घुले यांनी उपोषणापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केला असून पत्रामध्ये म्हटले आहे की अनेक बँका बेरोजगार युवकांना शासनाच्या महामंडळाकडून  मंजूर होऊन आलेले कर्ज प्रकरणे देत नाहीत गणेश घुले यांनी सोलापूर खाद्यी ग्रामोद्योग महामंडळ  यांचेकडे रु.२५ लाख कर्जास अर्ज केला ते प्रकरण नातेपुते येथील आयडीबीआय बँकेकडे   पुढील प्रक्रियेसाठी आले आहे.परंतु आयडीबीआय बँकेचे मॕनेजर टाळाटाळ करत आहेत  मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे  गणेश घुले यांनी सांगितले.

सदर प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments