#Malshiras:शासनाच्या आरोग्य सेवा व योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा - डॉ. आप्पासाहेब देशमुख


महादरबार न्यूज नेटवर्क  -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ,तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत माळशिरस ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन माळशिरस नगर पंचायतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाने नागरिकांना विविध आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनेक आरोग्य योजना सुरू केल्या आहेत तरी सर्व नागरिकांनी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी यावेळी केले. शासकीय रुग्णालयात देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा सर्व मोफत आहेत तसेच अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जातात .रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळत असते ,असे प्रतिपादन डॉक्टर देशमुख यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.


यावेळी नगरसेवक विजय देशमुख, नगरसेवक जगन्नाथ गेजगे, नगरसेविका रेश्मा ताई टेळे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष वाघमोडे ,सुरेश वाघमोडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ऐजाज काझी ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिंदे ,डॉक्टर मोनिका मिसाळ, डॉक्टर अनघा कुलकर्णी, वंदना रायबोले, बापू क्षीरसागर ,योगेश पुराणिक, यशवंत मोहिते यांच्यासह यांच्यासह सर्व रुग्णालयाने कर्मचारी उपस्थित होते .


डॉक्टर स्मिता शिंदे यांनी आपला मनोगतात रक्तदानाचे व रक्ताचे महत्त्व सांगितले ,तर डॉक्टर काझी यांनी ग्रामीण रुग्णालयातील सेवा व योजना यांचे सविस्तर माहिती दिली. यावेळी 192 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर या शिबिरात 31 जणांनी रक्तदान केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय साठे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत