महादरबार न्यूज नेटवर्क - छञपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नसून सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन जाणारे जागतीक किर्तीचे राजे होते असे मत शिवव्याख्याते विक्रम मगर यांनी व्यक्त केले.
येथील समस्त ग्रामस्थ नातेपुते,व अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी शिवप्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी दिपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शिवव्याख्याते विक्रम मगर,नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख,मार्केट कमिटी उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती माऊली पाटील,माजी सरपंच अमरशील देशमूख,नगरसेवक अॅड बी.वाय.राऊत,रणजित पांढरे,किशोर पलंगे, रणविर देशमूख,सपोनि प्रविण संपांगे,शरद बापू मोरे,राजाभाऊ देशमूख,डाॅ थोरात, पत्रकार सुनील राऊत,मोहीत जाधव,बाळासाहेब काळे, बशीर काझी,डाॅ.वैभव कवितके,महीला पतसस्थेच्या अध्यक्षा सूचिञादेवी देशमूख,मनिषा जाधव,वैशाली देशमूख ,जि.प.सदस्या सरोजिनी गरूड, आदि मान्यवर ,बहूसंख्य महीला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments