#Satara:माणमधील खडकीत एक कोटी रुपयांचा गांजा जप्त

म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई


महादरबार न्यूज नेटवर्क  - एकनाथ वाघमोडे
सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड नजीक खडकी परिसरात तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या ४२२ किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात कुंडलिक खांडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
         
खडकी परिसरात मका व डाळिंब बागेत गांजाची लागवड केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार सोमवारी (ता.१४) मध्यरात्री उशिरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले.
या आधी काही दिवसांपुर्वीच सातारा  जिल्ह्यातील म्हसवड शहरापासुन सुमारे दहा किलेमिटर अंतरावरील पानवण गावातील ऊसाच्या शेतात दडवून ठेवलेला तब्बल १५ लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी धाड टाकून जप्त करण्याची केला होता.
          
कुडलीक खांडेकर गेल्या तीन- चार वर्षापासून थोड्या फार प्रमाणात शेतातच गांजाची लागवड करीत हाेता. त्यातून त्याला चांगला आर्थिक लाभ आत्ता पर्यंत मिळाला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड त्याने केली असल्याचे पाेलिसांच्या प्राथमिक तपासात समाेर आले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम