Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun चिपळूण नगरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ द्या - आमदार शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गेल्या सहा वर्षात एकट्या चिपळूण शहरात तब्बल ३६० कोटीची सार्वजनिक विकास कामे शासनाच्या मदतीने पूर्ण करू शकलो. यामध्ये प्रामुख्याने नारायण तलाव, पवन तलाव, रामतीर्थ तलाव, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, शिवस्मारक, ग्रॅव्हिटी नळपाणी योजना, महापूर निर्मूलन करिता शिवनदी, वाशिष्ठी नदी गाळ उपसा, मुरादपूर-पेठमाप पूल, नलावडा बंधारा, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, गणेश विसर्जन घाट, कब्रस्तान  यांच्या पुनरुज्जीवनाबरोबर सामाजिक बहुउद्देशीय हॉल, ओपन जिम इत्यादी लोकहिताची कामे लोकार्पण झाली. यापुढेही चिपळूण नगरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शहरवासियांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे.
गेल्या सहा वर्षात आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघात तब्बल साडेतीन हजार कोटीचा निधी आणून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला यामध्ये एकट्या चिपळूण शहरात मोठा निधी आणण्यात ते यशस्वी ठरले. आतापर्यंत जे कुणाला जमलेले नाही ते आमदार निकम यांनी अल्पकाळातच करून दाखवले. चिपळूण हे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रात दबदबा असलेल्या चिपळूण नगरीला एका उंचीवर नेण्याच्यादृष्टीने आमदार निकम हे धडपडत आहेत. त्यांनी शहराच्यादृष्टीने विकासाचे संकल्प केले असून महापूरमुक्त चिपळूणसाठी ते करत असलेले प्रयत्न सर्वानाच ज्ञात आहेत. सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून याच पार्श्वभूमीवर  बोलताना गेल्या *सहा वर्षात या नगरीच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, भविष्यातील संकल्प आणि महापूरमुक्तीच्यादृष्टीने ते टाकत असलेली पावले यावर सविस्तर माहिती दिली.
शहरातील पूर नियंत्रित करण्यासाठी शिव नदी आणि वाशिष्ठी नदीचे पूर्ण संरक्षण करून गाळ उपसा करून, अतिरिक्त पाणी इतर उपयोगासाठी वळवून चिपळूणला पूरमुक्त करायचे आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळाच्या जोरावर मी पाठपुरावा करत आहे. अशा अतिशय महत्वाच्या कामासाठी सुमारे दोन हजार कोटीचा आराखडा शासनास सादर केला असून तो लवकरच मंजूर होईल.
शहर विकासासाठी प्रमुख संकल्प
यामध्ये नगरपरिषद इमारत बांधकाम ३० कोटी, बहादूरशेख नाका ते चिंच नाका आणि पॉवर हाऊस विस्तारित रस्ता कॉक्रिटीकरण, हायमास्ट लाईट व्यवस्थेसाठी ५० कोटी.. शहराच्या सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पासाठी ५४ कोटी,श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण २ कोटी, भाजी मंडई, मटण व मच्छी मार्केट एल शेप शॉपिंग सेंटर नव्याने विकसित करणे, शहरातील सर्व क्रीडांगणे, व्यायामशाळा, महिला क्रीडा संकुल आधुनिक करणे, शहरात उद्याने विकसित करणे, विरेश्वर कॉलनीमधील बांधकाम पूर्ण झालेली खुल्या भाजीमंडईचे लोकार्पण करणे. संपूर्ण शहरांमध्ये विद्युत केबल भूमिगत करणे,जुनी व नवीन बाजारपेठ व्यापारी बांधवांच्या सल्ल्याने अद्यावत करणे, संपूर्ण शहरांमध्ये विशेषतः बाजारपेठेत सुलभ शौचालय उभारणे, बाजारपेठेत ग्राहकांसाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाणपोई उभारणे आदी आपले संकल्प आहेत.
असा झाला ग्रॅव्हिटी मंजुरीचा
प्रवास...
गेली अनेक वर्षे रखडलेल्या ने ग्रॅव्हिटी नळपाणी योजनेच्या १६० कोटीच्या न खर्चास तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर त्याचे सध्या कामही सुरु झाले आहे. मात्र या योजना मंजुरीमागचा प्रवास सांगताना निकम म्हणाले, या योजनेसाठी राजस्थानचे र कन्सल्टेंट काम करत होते. ३ वर्ष झाले तरी कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती हे सर्वांना माहित आहे. न त्यानंतर रवींद्र चव्हाण, उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये मी, सर्व नगरसेवक उपस्थित होतो. त्यामध्ये PMC बदलून घेण्याचा निर्णय झाला. त्यानतंर नंतर मी विनंती केल्यानंतर जोशी कन्सल्टंट यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर जोशी यांच्या कायम संपर्कात राहून DPR चे ७ काम १ महिन्याच्या आत परिपूर्ण करून तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्यानंतर जीवन प्राधिकरणचे मुख्य -अभियंता प्रशांत भामरे यांना प्रत्यक्ष भेटून योजनेची आवश्यकता याची जाणीव करून देऊन साधारणपणे ४० दिवसांच्या आत योजनेचा १६०.६२ कोटी किमतीच्या प्रकल्पास तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेतली. तांत्रिक मान्यतेनंतर तो DMA मार्फत शासनास सादर करायचा होता. शर्मा साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून त्रुटींची पूर्तता करण्यात आली आणि पुढील १० दिवसांमध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला. त्याचवेळी विधानसभा निवडणूक तोंडावर होती. ही योजना होईल की नाही याबाबत माझ्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंका निर्माण होत होती. प्रशासकीय मान्यता कशी मिळणार हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता, कारण स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची निवडणूक पूर्वीची शेवटची बैठक होती. काही त्रुटी होत्या, मग मी अजितदादा तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत नगर विकासचे सचिव गोविंदराज साहेब यांच्याशी संपर्क करून ही चिपळूणची पाणी योजना ही कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे, असे सांगितले. मग SLTC च्या बैठकीमध्ये ही योजना घेतली गेली. त्याचवेळी चिपळूणला भरपूर अतिवृष्टी होत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर परत एकदा अजितदादा, पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती करून खासबाब म्हणून सदर बैठकीत चिपळूण शहर पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून नगरपरिषद व PMC कन्सल्टंट
यांच्यासमवेत साधारणपणे १ महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता घेण्यात आली व ८ दिवसामध्ये प्रशासकीय मान्यतेचा जीआर काढण्यात आला. ही सर्व प्रक्रिया सोपी नव्हती याची मला जाणीव होती. परंतु नगरपरिषदेचा सर्व कर्मचारी वर्ग, कन्सल्टंट तत्कालिन नगरसेवक, मंत्रालयातले अधिकारी व महायुतीचे सर्व नेते यांच्याशी असलेले माझे ऋणानुबंध याच्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे.
वाहतूककोंडीवर पेठमाप-मुरादपूर पुलाचा पर्याय...
शहरातील वाहतूककोंडी व पार्किंग समस्येबद्दलच्या उपाययोजनांबाबात बोलताना निकम म्हणले, मी आमदार झाल्यानंतर प्रथम कोणता प्रामुख्याने पहिला विचार केला असेल तर तो पेठमाप मुरादपूर पुलाचा २० कोटी खर्चुन करण्यात आलेले पुलाचे काम अंतिम टप्यात आहे.ज्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होईल त्यानंतर चिपळूणची वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. शहरात पार्किंगची समस्या देखील मोठी आहे. आणि त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून शहरात विविध ठिकाणी ७० लाख खर्चुन पार्किंग क्षेत्र विकसित केले आहे, असे ते म्हणाले.
आपण कधीही जातीचे राजकारण केले नाही. सर्व जाती धर्माचे लोक आपल्याकडे येत असतात. मी जातपात बघून कवीही राजकारण केले नाही. आपली जबाबदारी समजून आपण शहरातील अनेक सामाजिक बहुउद्देशीय सभागृहे मंजूर केली आहेत. त्यातील काही कामे बालू आहेत. मामध्ये मोई, शिंपी, वडार, मुस्लिम, बौद्ध, हिंदू अशा अनेक जाती धर्माची आपण सभागृहे उभी करीत आहोत. विशेष म्हणजे चिपळूण शहरातील मुस्लिम समाजाच्या जवळपास सर्व मोहल्ल्यातील कब्रस्थान सुशोभिकरण आपण करीत   आहोत   तसेच, रामतीर्थ तलाव स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम चालू आहे. मुस्लिम समाजाच्या अत्याधुनिक हॉलची १ कोटी २५ लाखाची संरक्षक भिंत बांधली शहरातील सर्व समाजाची स्मशानभूमी नूतनीकरण करून अद्यावत करण्याचा माझा प्रयत्नआहे
चिपळूणला पुढे नेण्यासाठी सर्वांची साथ हवी..
आपल्या नगरपरिषद निवडणुकीचा महत्वाचा क्षण जवळ आला आहे. आपल्या शहराचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत स्थिर व सकारात्मक बदल घडण्यासाठी आपल्या प्रभागांमध्ये सक्षम नेतृत्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उभे असलेले सर्व उमेदवार हे प्रामाणिक, मेहनती आणि विकासाच्या निश्वयाने पुढे जाणारे प्रतिनिधी आहेत. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. चिपळूणला पूरमुक्त करण्याबरोबरच पूररेषाही हटवायच्या आहेत
सर्वच क्षेत्रात शहराला वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे.आपण दिलेले प्रत्येक मत या प्रतिनिधींच्या मार्फत चिपळूणच्या प्रगतीला मजबुती देईल. यातूनच आपल्या भविष्यातील चिपळूणच्या विकासाची संकल्पना पूर्ण करू, त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मोलाची असल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments