Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे - राष्ट्रीय पत्रकार संघटनेची मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क  -
नातेपुते सह परिसरातील आजूबाजूच्या ३० ते ३५ गावांसाठी नातेपुते येथे आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय होणे महत्त्वाचे आहे नातेपुते परिसरातील गावांमध्ये गरीब शेतकरी व मजुरी करणारे गरीब मजूर यांचे प्रमाण जास्त असल्याने नातेपुते येथे खासबाब म्हणून उपजिल्हा  रुग्णालय होण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेच्या वतीने नातेपुते येथे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर, तालुकाध्यक्ष अभिमन्यू आठवले, कार्याध्यक्ष विलास भोसले, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज, सचिव हनुमंत माने, तसेच पत्रकार सचिन रणदिवे, सुनील ढोबळे,अनिल साळूंखे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments