#Natepte:आजचा सुदृढ बालक म्हणजे उद्याचा बलवान भारत : सोनिया बागडे
महादरबार न्यूज नेटवर्क -
आरोग्य बाबतीत शासनाचे उपक्रम व्यवस्थित राबवून मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लहान बालकापासून किशोरवयीन मुला-मुलींकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कारण आजचे बालक म्हणजे उद्याचे बलवान भारत ठरणार आहेत किशोरवयीन वय म्हणजे आयुष्याची जडणघडण होणारे वय असते आणि या वयात आहार आणि आरोग्य याकडे लक्ष दिले तर पुढची पिढी सुदृढ होईल आणि भारत देश बलवान होईल म्हणून १० ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुला मुलींची व्यवस्थित आरोग्याची तपासणी झाली पाहिजे
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे मुला-मुलींनी भविष्यात मोठे होऊन मनात निश्चय ठेवावा आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवून सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनात निश्चय ठेवला पाहिजे वाढदिवसाला रक्तदान करण्याची संकल्पना करूया राजकुमार हिवरकर पाटील यांना सामाजिक काम करण्याचा ध्यास आहे ते त्यांच्या कामातून दिसत आहे सर्वांना सामील करून ते काम करीत आहेत तसेच इथून पुढे आरोग्याच्या काही अडचणी असतील तर ते दूर केल्या जातील असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे महाआरोग्य शिबिर महारक्तदान शिबिर, किशोरवयीन मुले मुली आरोग्य तपासणी, सर्व रोग निदान शिबिर, नवीन आधार कार्ड काढणे कार्यक्रमा प्रसंगी केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहितेे, नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्षा उत्कर्षराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख , माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम पी मोरे,तालूकाअध्यक्ष राजकूमार हिवरकर, डॉ. स. म. शंकराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कोळेकर, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निटवे,
डाॅ.नरेद्र कवितके, नगरसेवक दीपक काळेे, नगरसेवक रावसाहेब पांढरे, डॉ. माने, डॉ. सातव, मोरोची प्रा . आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लाड, मांडवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.काजल कवितके , रिपाईचे एन के साळवे , भाजपचे देविदास चांगण,
दादा मुलाणी, जावेद मुलाणी , पोपट शिंदे , मुन्ना मुलाणी , अक्षय लांडगे, मनोज जाधव, आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा वर्कर आधी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे किशोरवयीन मुलींशी संवाद साधताना म्हणाल्या
आरोग्य हे धनसंपदा आहे आपण आपल्या आरोग्याची जर काळजी घेतली तर आपण व्यवस्थित राहू शकते चांगल्या आरोग्यासाठी आपले मन चांगले ठेवले पाहिजे चांगले जेवण स्वच्छ राहणे रोज व्यायाम केला तर चांगले आरोग्य राहील हे निश्चय केला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे आजची तरुण मुले फास्ट फूडकडे वळत आहेत मुलांनी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे फास्ट फूड न घेता घरचे जेवण जेवले पाहिजे दूध पेले पाहिजे व मैदानावरचे खेळ खेळले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी आरोग्य अधिकारी डॉ. एम पी मोरे यांनी केले तर आभार डॉ. सातव यांनी मानले.
Comments
Post a Comment