#Indapur:श्री.लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरुकुल मध्ये विद्यार्थी संस्कारक्षम व वारकरी शिक्षणाचे चांगले अध्यायन करतील - श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज


महादरबार न्यूज नेटवर्क  - बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री.लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल(प्रतिष्ठान) च्या इमारत बांधकाम भुमीपुजन संत तुकाराम महाराजांचे 9 वे वंशज श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. निरानरसिंहपुर येथे ह.भ.प अंकुश रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल मार्फत भक्त प्रल्हाद  संगीत विद्यालय चालू आहे तसेच वारकरी शिक्षण संस्था जुन2023 पासुन चालू करत आहेत.या साठी निरा नरसिंहपुर येथे इमारत बांधकाम भुमीपुजन करण्यात आले.

या प्रसंगी वेदपाठ शाळेतील बटु मुलांनी मंत्रघोष व मंत्रजागर केला.श्री.नृसिंह व श्री.विठ्ठल देवतेंच्या प्रतिमा पुजन व समई दीप प्रज्वलन श्री.गुरू बापुसाहेब देहुकर महाराज व देणगीदार ह.भ.प.आनंद काकडे महाराज  तसेच आलेल्या सर्व
मान्यवरांचे सरपंच व ग्रा.प सदस्य,चेअरमन,प्रतिष्ठीत नागरीक,वारकरी व संगमचे नुतन सरपंच श्री.नारायणराव ताटे देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.संस्थे मार्फत आलेल्या प्रमुख श्री.गुरू बापुसाहेब देहूकर महाराज यांचा कपडे,शाल श्रीफळ,.पुष्पहार देऊन सन्मान केला तसेच देणगीदार ह.भ.प चंद्रकांत काकडे काका,ह.भ प.आनंद काकडे महाराज,प्राचार्य रविराज काकडे सर,उपसरपंच सौ.रेणुका काकडे व कुटूबीयांचा सन्मान करण्यात आला तसेच संगमचे सरपंच,निरा नरसिंहपुरचे सरपंच व सर्व ग्रा.प सदस्य,गिरवी गणेश गांव,टणू,शेवरे सरपंच व ग्रा.प सदस्य,पदाधीकारी,वारकरी बंधु,जागा देण्यासाठी सहकार्य केल्या बद्दलश्री.वसंत घाडगे व कुटूंबीय तसेच ग्रा.पं निरा नरसिंहपुरचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.प सदस्य व आदर्श ग्रामसेवक गणेश लांभाते महिला भगिनी यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमात भक्त प्रल्हाद संगीत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई परीक्षेत चांगले यश संपादन केल्याबद्दल प्रशिस्त पत्रक,शाल,श्रीफळ,पुष्पहार तसेच ग्रंथपाल सौ.दुनाखे मॅडम यांनी दिलेल्या कंपाय पेटी देऊन  श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज,ह.भ.प.चद्रकांत काकडे काका,नारायणराव ताटे देशमुख,विजय सरवदे,सुर्यनारायण दंडवते,शितल मोहीते यांचे हस्ते करण्यात आला.तसेच गणेशगांवचे सरपंच किसन नलवडे यांनी इमारत बांधकामासाठी रुपये 21000/-₹ ची देणगी देण्याचे जाहीर केले व निरा नरसिंहपुरच्या लक्ष्मी नृसिंह मंदिराचे मुख्यपुजारी वेदमुर्ती वेदाचार्य नंदकुमार(ज्ञानेश्वर)डिंगरे यांनी  25000/-₹ ची देणगी इमारत बांधकामासाठी जाहीर केली आहे.या प्रसंगी प्राचार्य रवीराज काकडे सर यांनी अध्यात्मातुन देणारे शिक्षण व व्यवहारीक शिक्षण देणे काळाजी गरज आहे..तसेच ग्रा.प.सदस्य दशरथ राऊत यांनी ग्रा.पच्या वतीने एकमताने ठराव करून ही जागा अध्यात्म मंडळास दिली आहे तसेच पाणी या साठी बोअर पाडून देण्याचे व अडचणी सोडवु असे सांगीतले.सरपंच प्रतिनिधी विजय सरवदे यांनी गोशाळा चालू आहे दोन्ही संस्थांना सहकार्य करू .तसेच संगमचे नुतन संरंपच नारायणराव ताटे देशमुख यांनी या संस्थेस भरघोस मदत करणार आहे ह.भ.प अकुश महारांजांनी या जागेचा नकाशा,आराखडा इस्टीमेट  घेऊन या मार्ग काढू तसेच टेंभुर्णी येथील गोंविंद वृध्दाश्रमाचे अध्यक्ष दशरथ देशमुख यांनी माता-पालकांची सेवा करा.पोषण करा सांभाळा वृध्दाश्रमांची आवश्यकता लागणार नाही.अध्यात्म गुरूकुल मधील चार मुली दत्तक घेणार आहे हे सुचित केले.देणगीदार ह.भ.प. आनंद महाराज काकडे यांनी या संस्थेस एक खोली देण्याचे सांगीतले व पुढेही सहकार्य करण्याचे सागीतले तसेच ह.भ.प अंकुश रणखांबे यांनी मला अध्यात्माचे भजन,किर्तन,प्रवचन यांचे मार्गदर्शन केले व ते माझे अध्यात्मिक गुरू आहेत आणि त्यांचा पहिला विद्यार्थी आहे.संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज यांनी ही संस्था पंचक्रोशीची आहे सर्वांचे सहकार्याने ही लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक भवन उभारत आहे श्री.गुरू बापुसाहेब देहुकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आहेत वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहे निवासी विद्यार्थी ठेवत आहे अध्यत्मिक  व शालेय शिक्षण देत आहे.वसंत घाडगे व कुटूंबीय,चंद्रकांत काकडे व कुटूंबीय,ग्रा.पं निरानरसिंहपुरचे सरपंच व सर्व कार्यकारणी याचे सहयोगाबद्दल आभार मानले व नवीन इमारती साठी सर्वांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गुरू बापुसाहेब देहूकर यांनी ही अध्यात्मिक गुरूकुल संस्था संस्कारक्षम विद्यार्थी घडवतील व वारकरी शिक्षणाचे अध्यायन करतील संगीताला जीवनामध्ये फार महत्व आहे..संत तुकाराम महाराज यांना संगीत फार आवडायचे . या संगीत विद्यालयामधुन अनेक विद्यार्थी विषारद व कले मध्ये वादन,गायन,यामध्ये नैपुण्य मिळवतील तसेच या गावाला पौरार्णिक महत्व आहे ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज हि संस्था चांगली चालवतील अनेक वारकरी संप्रदायाचे शिष्य तयार करतील व या संस्थेतील चार विद्यार्थी दत्तक घेतआहे व संस्था चांगली आहे त्यांनी आशीर्वाद दिले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी केले त्यांनी निरानरसिंहपुरच्या क्षेत्राचे पौराणिक,धार्मीक,ऐताहासीक माहीती दिली..संत तुकाराम महाराज,संत नामदेव महाराज ,संत बहिणाबाई,आद्य शंकराचार्य,आद्य मध्वाचार्य,देवर्षी नारदांचा आश्रम यांची माहीती सांगीतली  लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट यांनी संगीत विद्यालयासाठी हार्मोनीयम पेटी, पखवाज,तबला,25टाळ,वीणा,मोठ्या दोन सतरंजी,देऊन सहकार्य केले आहे .तसेच..विकास व उत्कर्ष मंडळ यांनी नोटरी कराराने जागा दिली आहे.आभार डाॅ.अरूण वैद्य यांनी मानले.

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी ह.भ.प महादेव ताटे देशमुख,बाबुराव गव्हाणे,डाॅ.अरूण वैद्य,वसंत घाडगे,गणेश चोपडे,श्री.नारायण मस्के,ह.भ.प आनंद काकडे महाराज यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम