#Akluj:रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे
महादरबार न्यूज नेटवर्क -
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्था अकलूज च्या चेअरमन पदी शिवाजी देशमुख तर व्हॉइस चेअरमन पदी सुजित तरंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील व मा.श्री. राजसिंह मोहिते पाटील यांनी 1जून 2006 रोजी स्थापन केलेल्या रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये संचालक मंडळ निवड बिनविरोध झाली तर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूकसाठी चेअरमन पदासाठी शिवाजी देशमुख यांचा एकमेव तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुजित तरंगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जी .बी. जाधव यांनी बिनविरोध घोषित केले.
संस्थेचे मार्गदर्शक माजी मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,मा.राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,संचालक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. या संस्थेमार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाशिवाय आडत विभाग फलोत्पादन विभाग बियाणे प्रक्रिया विभाग बी बियाणे व कीटकनाशके विभाग चारा बियाणे विक्री विभाग प्रोसेसिंग युनिट चाळणी युनिट हे विभाग चालवण्यात येतात .
याप्रसंगी नूतन चेअरमन शिवाजी देशमुख,व्हाईस चेअरमन सुजित तरंगे माझी व्हॉइस चेअरमन हनुमंत सरगर यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला तसेच कचरेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच पदी निवड झालेल्या उज्वलाताई सरगर , महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कृत रत्नमाला तरंगे, व शोभाताई वाघमोडे यांची एजेएफसी या पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी संचालिका शितलदेवी मोहिते पाटील, पुष्पलता पाटील ,संचालक संभाजी कदम, संदीप घाडगे, आनंद तोडकरी, दत्तात्रय मुंडफणे , सागर यादव, महादेव साबळे आदि नूतन संचालक मान्यवर उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थेचे मॅनेजर दिलीप शिरसट व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
"शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमाची माहिती देणे व राबविणेसाठी प्रवृत्त करणे,बिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांना बियाण्यांची अनुवंषीकता , भौतिक गुणवत्ता टिकविणेसाठी व त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे तयार करून देणे,शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे नविन सुधारीत तसेच संकरीत वाण उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न करणे,दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये अधिक चारा देणाऱ्या वाणाच्या बियाणाचे उत्पादन करणे , बियाणे उपलब्ध करुन देणे व मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांनी शेतामध्ये उत्पादीत केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देणेसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या फळे व भाजीपाला विक्रीसाठी वेगवेगळी बाजारपेठ उपलब्ध करून देणे,शेतकऱ्यांच्या पिक संरक्षणासाठी किटकनाशके , बुरशी नाशके , तणनाशके उपलब्ध करुन देणे आदी उद्देशाने संस्थेचे कार्य सातत्याने सुरू असते."
धैर्यशील मोहिते पाटील
मार्गदर्शक संचालक, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बिजोत्पादक सहकारी संस्था,अकलूज
मार्गदर्शक संचालक, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बिजोत्पादक सहकारी संस्था,अकलूज
Advertisement
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त उत्तम बियाणे व शेती औषधे, चांगला बाजार भाव मिळवून देणे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा सदैव प्रयत्न राहील.
शिवाजी देशमुख
नूतन चेअरमन, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्था,अकलूज
Comments
Post a Comment