#Chiplun:चिपळूण येथे जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
राष्ट्रीय कृषि विभाग भात लागवड गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रिडासंकूलात जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार दिनांक.२९/०३/२०२३.रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी व उपविभागीय कृषि अधिकारी, चिपळूण यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कृषि प्रदर्शनात विविध कृषि उत्पादने, यंत्रसामुग्री, खते, बी-बियाणे, महिला बचत गटांची उत्पादनांचे विविध ५५ स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गटांनी तृणधान्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल्स असून पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील भातपिकांचे विविध वाण, भातपिकासाठी यांत्रिकीकरण तसेच लागवड कापणी, मळणी, काढणीपश्चात तंत्रज्ञान यांची विविध कंपन्यांचे अवजारे उपलब्ध केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक भागातील शेतकरी बांधव विविध उत्पादनांसह प्रक्रिया उद्योगांवरही आता भर देऊ लागला आहे. महिला बचत गटांची उत्पादनेही वाढली असून शेतक-यांसह बचतगटाच्या महिलांना जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन व विक्रिच्या माध्यमातून बाजारपेठ मिळण्यास मदत होते व येथे उत्पादक आणि ग्राहक यांचा कोणत्याही दुवाशिवाय भेट होते.
Comments
Post a Comment