महादरबार न्यूज नेटवर्क - 'सकाळ' माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) चळवळीत सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी दयानंद विधी महाविद्यालयचे विद्यार्थी आकाश पुजारी यांची निवड सकाळच्या (यिन) समूहाच्या वतीने करण्यात आले.
नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत ही निवडणूक दर वर्षी प्रत्येक महाविद्यालयात घेतले जाते. यामध्ये नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या आधारावर महाविद्यालयांतून झालेली ही निवड म्हणजे तरुणांच्या मनातील निवड आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आकाश पुजारी म्हणाले की, माझी निवड झाली याचा मला आनंद आहे पण मी यापुढे भविष्यामध्ये तर सक्रिय राहून 'यिन' ची चळवळ कशी वृद्धिंगत होईल, याकडे लक्ष देईन व जीव ओतून युवकांसाठी काम करणार असल्याचेही सांगितले.
0 Comments