#Natepute:धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते तालुका माळशिरस येथे समस्त धनगर समाज राज्स्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. ३० एप्रिल रोजी नातेपुते येथील प्रसिद्ध राजआनंद मंगल कार्यालय नातेपुते येथे करण्यात आले आहे. नातेपुते मध्ये वधू वर मेळाव्यास कायमस्वरूपी चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समस्त धनगर समाज वधूवर मेळाव्याचे अध्यक्ष विजयकुमार रघुनाथ उराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


ते पुढे म्हणाले की आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्याही पेक्षा वधुवर निवडीचा प्रश्न जास्तच सध्याच्या काळात बिकट होत चालला आहे. त्यामुळे आम्ही समाजातील बांधव एकत्रीत येऊन या राज्यस्तरीय धनगर समाज सर्व पोट शाखीय वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये समस्त समाज बांधवांच्या कडून शेतकरी  कुटुंबातील, व्यवसायिक, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरदार, पदवीधर, इंजिनिअर ,डॉक्टर ,शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मुला मुलींची नाव नोंदणी होत आहे.अजूनही इच्छुक मुला-मुलींनी या वधु वर परिचय मेळाव्यामध्ये दि. १५ एप्रिल २०२३ पर्यंत संपर्क मो ८०८७७०३४१६ व ९८९०३७३२९५ या नंबरवर फोनकरून आपली नाव नोंदणी करावी. यातून समस्त समाज बांधव एकत्रीकरण व्हावे व समाजाचे असणारे प्रश्न या व्यासपीठावर मांडता येतील एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व स्तरातून उदंड अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे , वेळ, पैसा व श्रमाची बचत व्हावी, एकाच व्यासपीठावर पाहणी करून मुलामुलींची निवड करता यावी यासाठी वधुवर परिचय मेळाव्याची गरज आहे. परिचय पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात  येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम