#Chiplun:कळकवणे येथे आ. शेखर निकम यांच्या शुभहस्ते ओवळी -कळकवणे(दादर)-वालोटी ग्रॅव्हिटी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शुक्रवार दि. ७. ०४.२०२३ रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते ओवळी-कळकवणे (दादर)-वालोटी ग्रॅव्हिटी नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमी पूजन संपन्न झाले. ही नळ पाणी पुरवठा योजना व्हावी अशी तिन्ही गावातील ग्रामस्थांची मागणी होती. त्याचा पाठपुरावा कळकवणे (दादर)-ओवळी-वालोटी शिखर समिती अध्यक्ष ऍड.अमित अशोकराव कदम व त्यांचे सहकारी यांनी केला. या कामी त्यांस रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अशोकराव कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने सदरची योजना मंजूर होऊन तिचे काम सुरु झाले. भूमी पूजनास उपस्थित सर्व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम सर यांचे आभार मानले.तसेच सदर दिवशी आमदार शेखर निकम सर यांच्या प्रयत्नाने झालेल्या कळकवणे-दादर येथील रामवरदायीनी मंदिराकडे जाणाऱ्या पूलाचे उदघाटन आमदार शेखर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हा पूल सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत कोसळला होता. सदर पूल तुटल्याने संपूर्ण दसपटीचा तालुक्याशी जनसंपर्क तुटला होता. आमदार शेखर सर यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित दादा पवार साहेब यांच्या सहकार्याने सदरचा पूल मंजूर केला व सदर पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने संपूर्ण दसपटीची गैरसोय दूर झाली. आमदार शेखर सरांच्या या तत्पर कार्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.तसेच सदर दिवशी आमदार शेखर सरांच्या प्रयत्नाने झालेल्या कळकवणे अडरेकरवाडी रस्त्याचे, कळकवणे गुरववाडी रस्त्याचे उदघाटन आमदार शेखर सरांचे शुभहस्ते करण्यात आले.तसेच या दिवशी आमदार शेखर सरांच्या प्रयत्नाने कळकवणे अडरेकरवाडी येथे मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफॉर्मर चे भूमी पूजन आमदार शेखर निकम सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कळकवणे गावात एकाच जुन्या ट्रान्सफॉर्मरवर संपूर्ण गावाचा इलेक्ट्रिसिटी भार असल्याने वोल्टज ची अडचण संपूर्ण गावास अनेक कित्येक वर्ष भासत होती. सबब नवीन ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी समस्थ ग्रामस्थांची होती. सदर मागणीचा पाठपुरावा ऍड.अमित कदम व त्यांचे सहकारी यांनी आमदार शेखर सरांकडे केला. आमदार शेखर सरांनी सदर मागणीस प्राधान्य देऊन सदरचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केला. सर्व समस्थ ग्रामस्थांनी आमदार शेखर सरांचे आभार मानले.तसेच आमदार शेखर सरांनी कळकवणे फाटा येथे व कळकवणे झोलाई मंदिर येथे मंजूर केलेल्या पिकअपशेडचे देखिल भूमिपूजन आमदार शेखर सरांचे शुभ हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास आमदार शेखर सर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, कळकवणे(दादर)-ओवळी-वालोटी शिखर समिती अध्यक्ष व राष्ट्रवादी रत्नागिरी लीगल सेल जिल्हाध्यक्ष ऍड अमित कदम, शिखर समिती उपाध्यक्ष संजय गणवे, सचिव सतीश सुर्वे, संपर्क प्रमुख दिपीका शिंदे, सदस्य सुरेश कदम, दिनेश शिंदे, कविता आंबेडे, अवंतिका आंबेडे, राष्ट्रवादी कोल्हापूर सहकार जिल्हाध्यक्ष देसाई साहेब, चिपळूण पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, राजाभाऊ चाळके, डॉ. राकेश चाळके, मुंढे गावचे सरपंच मयूर खेतले, रुपेश खेतले, कळकवणे-दादर सरपंच सविता निकम, उपसरपंच अल्का शिंदे, सदस्य महेश शिंदे, मानसी कदम, तनया धुलप, सुरेखा गमरे, वैशाली नलावडे, अनुराधा पवार, माजी सदस्य विलास सकपाळ, प्रवीण पवार, विजय टाकळे, भाऊ ज्यागुस्टे, आबाभाई शिंदे, ज्येष्ठ ग्रामस्थ मानसिंग कदम, श्रीराम कदम, जयसिंग शिंदे , यशवंत गणवे, वसंत घाणेकर, मनोहर शिंदे, दगडू झुजम, विलास झुजाम, बाळा धुलप, किशोर शिंदे, संजय शिंदे, महेश कदम, अमेय शिंदे, नलावडे, मुकुंद शिंदे, सुशांत सुर्वे, बाबू शिंदे, दिनेश कदम, विजय सुर्वे, कृष्णा आंबेडे, कोंडूवरक, बाबू गोरे, ठेकेदार पदमरचना इंजिनिर्स चे रेडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माने मॅडम, महेश वाजे व तिन्ही गावातील असंख्य ग्रामस्थ, आमदार शेखर सरांचे स्वीय सहाय्यक रुपेश इंगवले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment