#Baramati:आयुष्यात कष्टाला नेहमी चांगले फळ मिळते - किशोर कुमार शहा


महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड व सत्यमेव अकॅडमी बारामती यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या पोलीस भरती स्पर्धेच्या निकालानंतर बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड झाली आहे. अशा जवळपास 70 विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी एमआयडीसी शाखेत करण्यात आला.

यावेळी श्री किशोर कुमार शहा बोलत होते.ते म्हणाले माणसाने आपल्या आयुष्यात योग्य दिशेने कष्ट घेतल्यास व जिद्दीने येणाऱ्या संकटांना सामोरे गेल्यास यश मिळतेच. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीशी थाप देण्यासाठी बारामती  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे हे देखील उपस्थित होते.

यावेळी सदर कार्यक्रमासाठी सत्यमेव करिअर अकॅडमी चे संचालक श्री शरद नामदे,संतोष जगताप श्री गव्हाणे सौ सुळ मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी क्लस्टर मॅनेजर श्री दीपक वाबळे, अमोल पात्रे, कुमार राठोड, राहुल घोरपडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे नियोजन सागर मदने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार धनंजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम