#Mumbai:नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या चौकशीचा अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगर विकास विभागाकडे वर्ग
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची निवेदनात दिलेल्या मुद्द्यानुसार सखोल चौकशी करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव साहेब यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती. मुख्य सचिव साहेबांनी सदर प्रकरणाची त्वरित दखल घेणे अपेक्षित होते.परंतु तसे न झाल्याने माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागली.माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने लगेचच दखल घेत नगर विकास विभागाकडे पुढील योग्य कार्यवाही साठी प्रकरण तात्काळ पाठवले.परंतु नगर विकास विभागाने याबाबत कोणतीच पुढील कारवाई न केल्यामुळे मा.मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे नगर विकास करत असलेली टाळाटाळ याबाबत कल्पना दिली असता.मा.मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयाने नगर विकास विभागाला पुन्हा कारवाई बाबत सूचना केल्या आहेत.
नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांची सखोल चौकशीतील मुद्दे आदरणीय राज्यपालजी यांच्या आदेशांचे पालन व त्यानुसार अंमलबजावणी करताना नगरपंचायत चे मुख्याधिकारी दिसत नाहीत.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केंद्र व राज्य शासनाचे अधिनियम असतानाही मुख्याधिकारी मनमानी कारभार करत आहेत.केंद्र व राज्य शासनाकडून तसेच विविध माध्यमातून मिळणारे निधी,अर्थसहाय्य यामध्ये अपहार झाल्याचे दिसून येत आहेत.नगरपंचायत सर्व प्रकारच्या सभा व ठराव तसेच शासनाकडे पाठवलेले प्रस्ताव नुसार कामकाज न करता मनमानी पद्धतीने कामकाज करण्यात आले आहे. नगरपंचायत कडे आलेले सर्व अर्ज,पत्र व इतर माध्यमातून आलेल्या तक्रारी,निवेदने,विनंती व इतर बाबींवर मुख्याधिकारी यांनी जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.नगरपंचायत मध्ये ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांचे समावेशन तसेच अधिकारी व इतर कामगार यांची नियुक्ती बाबत भोंगळ कारभार सुरु असून यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होताना दिसत आहे.नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी यांचे दालन सोडून इतरत्र सीसीटिव्ही कॕमेरे बसवले आहेत मात्र जाणूनबुजून स्वतःच्या दालनात कॕमेरे बसवला नाही याचीपण चौकशी झाली पाहिजे.अशाप्रकारे अनेक गोपनीय मुद्दे यांची सखोल चौकशी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव साहेब यांनी करावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी केली आहे.
नमूद मुद्द्यानुसार चौकशी झाली नाही तर लोकशाही मार्गांने आंदोलन करणार असल्याचा इशारा विनायक सावंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव साहेब यांना दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी दुसऱ्या वेळेस नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आले असल्याचे विनायक सावंत यांनी सांगितले.नगर विकास विभाग मा.मुख्यमंत्री साहेब कार्यालयाच्या सूचनांचे पालन करत नसेलतर राज्यात सुप्रशासन कसे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरु राहणार आहे असेही विनायक सावंत यांनी सांगितले.
Comments
Post a Comment