#Natepute:देवाच्या रूपाने आमदार राम सातपुते भेटले - बाजीराव राणे


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस मतदारसंघातील पिंपरी येथील अंध बाजीराव राणे यांना  मूत्राशयाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑपरेशन करणे गरजेचे होते. बाजीराव राणे हे डोळ्याने देखील पाहू शकत नव्हते. राणे हे माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार आरोग्य दूत राम सातपुते यांना भेटले. भेटल्यानंतर त्यांनी आमदार साहेबांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर आमदार साहेबांनी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुमारे अडीच लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया मोफत करून दिली.


सुमारे अडीच लाख खर्चाची शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याने बाजीराव राणे हे खूप आनंदी झाले. त्यावेळी बाजीराव राणे म्हणाले की देवाच्या रूपाने आमदार राम सातपुते आम्हाला भेटले ते आमच्यासाठी देवच आहेत.
माळशिरस तालुक्यातील पहिलाच आमदार जनतेची कामे प्रामाणिकपणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचून करत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य दूत राम सातपुते हे गरीब गरजू कुटुंबीयांचे वैद्यकीय खर्च मोफत करत असल्याने त्यांचे पिंपरी सह माळशिरस तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम