#Natepute:अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने बुद्धीजीवी वर्गाचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
राष्ट्रपिता महात्मा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,भगवान गौतम बुध्द व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे संयुक्त जयंती निमित्त व जनकल्याणकारी लोकराजा शाहु महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त हा बुध्दीजीवी वर्गाचा सन्मान  सोहळा व कार्यकर्ता प्रबोधन शिबीर अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.प्रस्ताविक  किसनराव ढोबळे सर यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत घनशामदादा ढोबळे व सुनिल ढोबळे यांनी केले .सर्व मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने होलार समाजामध्ये  असणारे डॉक्टर,वकील व प्राध्यापक यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जिवन गौरव पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले.तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून होलार समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले.अतिशय छान व नियोजनबध्द असे व्यवस्थापन अखिल भारतीय होलार समाज संघटना शहर शाखा-नातेपुते यांनी केले होते.त्यामुळे त्यांचे समाजामध्ये कौतुक होताना दिसत आहे.

या कार्यक्रमास माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,राष्ट्रीय नेते किरण जावीर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक एस के आयवळे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा उपसभापती मामासाहेब पांढरे ,ज्येष्ठ नगरसेवक बी वाय राऊत, बांधकाम समितीचे सभापती अतुल पाटील, नगरसेवक रणजित पांढरे,अण्णा पांढरे, सपोनी संपांगे साहेब, आर पी आय चे दयानंद धाईंजे, नुतन संचालक महावीर गांधी, रासपचे बशीर काझी,गोरख ढोबळे,शिवाजी होनमाने,सुरज हेगडे,गणेश जाधव,सोमनाथ ढोबळे,सचिन गोरवे वैभव ढोबळे,व्यंकट ढोबळे,बाबु ढोबळे,श्रीराम ढोबळे आदी उपस्थित होते.आभार शंकर ढोबळे यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत