#Varvand:आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यत शैक्षणिक शालेय फि मध्ये सवलत द्यावी - संभाजी दहातोंडे


महादरबार न्यूज नेटवर्क -   अक्षता हनमघर
आरटीई'  शैक्षणिक  सवलत दहावीपर्यत मिळावी
मराठा महासंघाची मागणी संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना मुंबई येथे निवेदन  देण्यात आले.
आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शालेय फी मध्ये सवलत दिली मात्र, ज्या वर्गासाठी भरमसाठ फी आहे त्याच काळात म्हणजे नववीपासून सबंधित पालकाना शुल्क भरावे लागत आहे.

हे शुल्क भरण्याची ऐपत नसलेल्या पालकांच्या पाल्याचे शिक्षण अडचणीत येत आहे. राज्यातील सुमारे ७०हजार अधिक विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी ही सवलत दहावीपर्यत करावी अशी मागणी    शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे.

संभाजीराव दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरिब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबातील बालकांना नामांकित खाजगी शाळांत शिक्षण घेता यावे यासाठी शासनआरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत २५% जागा राखीव ठेवून त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो. संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरते. २०१४ साली सर्वप्रथम प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची आता मुदत संपली आहे.  या उपक्रमामुळे गरिब कुटूंबातील मुलांनाही नामांकित खाजगी शाळांत शिक्षण घेता येत आहे. यात बहूतांश पाल्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजुर व वंचित घटकातील आहे. मात्र ही शैक्षणिक सवलत आठवी वर्गापर्यतच आहे. नववीपासून सबंधित शाळांना शैक्षणिक शुल्क (फि) सबंधित पालकांना भरावी लागते. ज्या काळात जास्तीचे शुल्क आहे अशाच काळात ही सवलत बंद होत आहे.

मुळात गरिब असल्यानेच अशा पालकांना शैक्षणिक सवलत दिली आहे. नववी व दहावीच्या वर्गासाठी खाजगी शाळांत लाखो रुपये शु्ल्क आहे. एवढी फि भरु न शकणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने नववी व दहावी वर्गात शिकवताना मोठा त्रास सोसावा लागत आहे. आर्थिक ताण वाचवण्यासाठी अन्य शाळांतही प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे नववी व दहावी वर्गासाठीच्या प्रवेश अन्य निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेऊन अनेक पालकांना मनस्ताप सोसावा लागत आहेत. त्यामुळे आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या राज्यातील लाखो पालकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी आरटीई अंतर्गत अंतर्गत दहावीपर्यत शैक्षणिक शुल्क शिक्षण सवलत करावी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे. राज्यातील गरीब वंचित कुटुंबातील शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न असा आहे .याबाबत  आंदोलन करण्याचा इशाराही दहातोंडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम