Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा डॉक्टर सेल तालुका चिपळूण यांच्या वतीने आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत डॉक्टर डे संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण खेर्डी येथील हॉटेल मीरा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा डॉक्टर सेल तालुका चिपळूण यांच्या वतीने आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत डॉक्टर डे संपन्न झाला. याकार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉक्टरांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव देखील करण्यात आला.

1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या समर्पण, कार्य, निष्ठा आणि आपल्या जीवनासाठी आणि शेवटी देशासाठी सेवा यांचा सन्मान आणि अभिवादन करण्यासाठी साजरा केला जातो.


डॉक्टरांना देवाच्या खालोखालचा दर्जा दिला जातो कारण देव आपल्याला जीवन देतो आणि डॉक्टर आपल्याला ते जीवन निरोगीपणे जगण्यास मदत करतात. मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान तुलना करण्यापलीकडे आहे. डॉक्टर रुग्ण आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण आणि प्रचार करतात. हा दिवस सर्व डॉक्टरांचे कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल आभार मानण्यासाठी आहे.


डॉक्टरांना देव का म्हणतात याची प्रचिती लोकांना कोरोना काळात आली. चिपळूण मध्ये पूर आला त्यावेळी सुद्धा डॉक्टरानी दिलेली सेवा व त्यांचे योगदान खूपच मोठे आहे तसेच इतर लहान मोठ्या आजारावर उपचारांचा विचार करता त्यांचे जीवनातील महत्त्व लक्षात येते. या डॉक्टर डे च्या दिवशी आमदार शेखर निकम यांनी कार्यक्रमास  उपस्थित राहून डॉक्टरांना मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी डॉ. संतोष दाभोळकर (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ. रणजित पाटील (जिल्हाध्यक्ष), डॉ. अब्बास जबळे (तालुकाध्यक्ष),  डॉ. रहमत जबळे (महिला जिल्हा संघटक), डॉ. मुश्ताक मुकादम (जिल्हा संघटक), डॉ. माधुरी पाटील (महिला जिल्हा समन्वयक), अबु ठसाळे, दशरथ दाभोळकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. यतीन जाधव आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments