#Chiplun:कोकणवासीयांच्या समस्या दूर करण्यास बळ देण्यासाठी आ.शेखर निकम यांचे गणरायाला साकडे



चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या घरी गणराय विराजमान


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
येथील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून निकम दांपत्याने आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत जल्लोषात केले आहे. तसेच गणपती बाप्पाच्या पाहुणचाराची जय्यत तयारी केली आहे.
    
साध्या सरळ सजावटीत व हार फुलांच्या माळांनी सजलेल्या आरासमध्ये विराजमान झालेल्या गणरायाची प्रसन्न मुद्रा पाहून दर्शनासाठी येणाऱ्या आप्तेष्ट व मित्रमंडळींना देखील भुरळ पडत आहे. यातच नेहमीच आपल्या राजकीय धकाधकीच्या जीवनात व्यस्त असलेल्या निकम दाम्पत्यांना निवांत वेळ काढून बाप्पाच्या सेवेत रममाण झालेले पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
     
यंदा आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत शेखर निकम यांनी आपल्या कोकणवासीय बांधवांसाठी त्यांच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी कृपाशिर्वाद मागितला. त्यांच्या समस्या, संकटं दूर करण्यासाठी राजकीय पक्षात राहून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला वारंवार संधी मिळावी अशी मागणी त्यांनी गणरायाजवळ केली.
    
एकूणच विद्येचे दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाने निकम परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेखर निकम व त्यांच्या पत्नी पूजा निकम यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्यामुळे गणपती बाप्पा नक्कीच त्यांची मनोकामना पूर्ण करेल अशी आशा कोकणवासीय व्यक्त करत आहेत.l

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम